पपई सहजरीत्या उपलब्ध होणारे फळ आहे. पपई खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. पपई वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का कि पपई तुम्हाला सुंदर देखील बनवू शकते. होय, पपईच्या ब्यूपटी बेनिफिट्सबद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आजच्या या लेखामधून आपण पपईचे फायदे जाणून घेणार आहोत. पपई आपल्या त्वचेच्या समस्यांवर प्रभावी ठरते.

पपईमध्ये लपले आहे सौंदर्याचे रहस्य

पपई हे त्वचेसाठी पोषक आहे. यामध्ये असलेले विटामिन ए आणि पापेन नावाचे एंझाईम डेड स्किन हटवण्यास मदत करते. त्याचबरोबर त्वचेवरील डाग हटवण्याचे देखील काम करते. त्वचेची फ्लेक्सिबिलिटी मेंटेन करते. सुरुकुत्या पडू देत नाही. पपईमध्ये असलेले विटामिन सी, विटामिन ई आणि बीटा कॅरोटीन सारखे अँटी-ऑक्सीडेंट्स तुमची स्किन क्लीन आणि क्लियर करते. रिंकल्स देखील स्किन पासून दूर राहते. पपई डल स्किन आणि एजिंग इफेक्ट कमी करते.

तजेलदार त्वचेसाठी

जर तुमची स्किन डल झाली असेल, त्वचा तजेलदार नसेल तर तुम्ही पपईचा फेस पॅक वापरू शकता. दोन ते तीन दिवसांमध्ये हा पॅक चेहऱ्यावर लावावा. हा फेस पॅक अशाप्रकारे तयार करा, पिकलेली पपई चांगल्या प्रकारे मॅश करा, यामध्ये ३ चमचा मध आणि एक चमचा मुलतानी माती मिसळा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर आणि गळ्यावर चांगल्याप्रकारे लावा. जेव्हा हा फेस पॅक पूर्णपणे सुकेल तेव्हा पाण्यामध्ये हात ओला करून हळूहळू चेहऱ्याची मालिश करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

मुरूम दूर करण्यासाठी फेस पॅक

जर तुम्ही मुरुमांमुळे त्रस्त आहात तर कच्ची पपईचा पॅक तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. कच्ची पपई खिसून त्याची पेस्ट बनवा, हि पेस्ट चेहऱ्यावर अर्धा तास लावून ठेवा. सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यामध्ये ३ वेळा हा उपाय करावा, प्रभाव दिसू लागेल. अनेक लोकांच्या चेहऱ्यावर पोर्स म्हणजे रोमछिद्र दिसून येतात. हे दूर करण्यासाठी पिकलेली पपई आणि केळाच्या सालीची पेस्ट बनवावी आणि त्यामध्ये मुलतानी माती टाकून हा फेस पॅक चेहऱ्यावर लावावा. फेस पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे आठवड्यामधून तीन वेळा करावे.

रिंकल पॅक

कच्च्या पपईच्या पेस्टमध्ये कांद्याचा रस मिसळा. यामध्ये काही टोमॅटो आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. हि पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुखल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

सॅनटॅन रिमूव्हिंग पॅक

पपईला काकडी आणि कच्च्या दुधामध्ये एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. यामध्ये थोडीशी मुलतानी माती मिसळून ती पेस्ट सनबर्न स्किनवर लावा.

अँटी एजिंग मास्क

पपईसोबत एक कच्चे अंडे मिक्स करा, फक्त अंड्यामधील पांढऱ्या भागाचा वापर करावा. जेव्हा हे पूर्णपणे सुकेल तेव्हा याला स्वच्छ पाण्याने धुवा. हा पॅक आठवड्यातून २ चेहऱ्यावर लावावा, हा पॅक रिंकल्से दूर करून चेहऱ्यावरील फाईन लाईन्स देखील कमी करतो.

डँड्रफ हटवते

कच्च्या पपईच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस मिसळा आणि यामध्ये थोडे दही मिसळून केसांच्या मुळांपर्यंत लावा. अर्ध्या तासानंतर शॅम्पूने केस धुवा. डँड्रफ दूर होईल.

नॅचरल कंडीशनर

४ चमचे पिकलेल्या पपईच्या पेस्टमध्ये एक पिकलेले केळे मॅश करून घ्या. दोन चमचे दही आणि एक चमचा कॅस्टर ऑईल आणि एक चमचा नारळाचे तेल मिसळून याची पेस्ट बनवा. हि पेस्ट केसांच्या मुळांपर्यंत चांगली लावा. एक तासानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्या.

टीप: या लेखामध्ये दिलेले माहिती हि सर्वसामान्य माहितीच्या आधारावर दिलेली आहे. YesMarathilive.in याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने