आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शरीरावर दिसणाऱ्या तिळांच्या बाबतीत. ज्योतिषच्या आधारावर शरीराचे काही असे मुख्य स्थान आहेत जिथे तीळ असणे खूपच चांगले आणि शुभ मानले जाते. शरीरावर अनेक ठिकाण नैसर्गीक तीळ असतात. अनेक लोकांच्या शरीरावर तीळ खूपच सुंदर दिसतात. तर अनेक लोकांना तीळ असण्याने काहीच फरक पडत नाही. तीळ चांगले दिसणे किंवा तीळ असल्याने काहीच फरक पडणे हे मॅटर करत नाही. वास्तविक हे सर्व या गोष्टीवर अवलंबून असते कि व्यक्तीच्या शरीरावर तीळ कुठल्या ठिकाणी आहे. तसे तर शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी तीळ असण्याचे महत्व शास्त्रांमध्ये वर्णन केले आहे. आम्ही तुम्हाला अशा चार स्थानांबद्दल सांगणार आहोत ज्या ठिकाणी तीळ असणे खूपच शुभ मानले जाते. शास्त्रानुसार सांगितले गेले आहे कि अशी कोणती चार स्थाने आहेत ज्याठिकाणी तीळ असणे खूपच शुभ मानले जाते.

पहिले स्थान

आपल्या चेहऱ्यावरील ओठांच्या खालचा भाग ज्याला आपण अनुव्हटी म्हणतो. याठिकाणी तीळ असणे खूपच शुभ मानले जाते. शास्त्रानुसार ज्या लोकांच्या अनुव्हटीवर तीळ असते अशा व्यक्तींची सर्व बिघडलेली कामे मार्गी लागतात. अशा लोकांची आर्थिक स्थिती देखील चांगली असते. जर एखाद्या पुरुषाच्या अनुव्हटीवर तीळ असेल तर अशा व्यक्तीमध्ये पैसे कमावण्याची जिद्द असते तर ज्या महिलेच्या अनुव्हटीवर तीळ असते अशा महिलांना इतर महिलांच्या तुलनेत सजण्या सवरण्यामध्ये जास्त आवड असते. या महिला इतर महिलांच्या तुलनेत जास्त खर्च करतात. अनुव्हटीवर तीळ असलेल्या व्यक्तीला कमी मेहनतीमध्ये चांगले परिणाम मिळतात आणि व्यक्ती कमी प्रयत्नांमध्ये चांगले स्थान प्राप्त करतो. ज्यांच्या अनुव्हटीवर तीळ असते अशा व्यक्तींमध्ये कोणतीना कोणती कला आधीपासूनच असते. अशा व्यक्ती गॉड गिफ्टेड असतात.

दुसरे स्थान

शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे दुसरे स्थान जिथे तीळ असणे शुभ मानले जाते ते म्हणजे दोन्ही डोळ्यांच्या मधील भाग ज्याला आपण नाक म्हणतो. शास्त्रानुसार ज्या लोकांच्या नाकावर तीळ असते हे लोक साफ मनाचे असतात. थोडासा नखरेपणादेखील या लोकांमध्ये पाहायला मिळतो. चेष्टा मस्करी करणे या लोकांना खूपच पसंत असते. हे लोक स्वतःच्या मेहनतीच्या बळावरच पुढे जातात. ज्या व्यक्तींच्या नाकावर तीळ असते अशा लोकांना आयुष्यामध्ये ग्रोथ नक्की मिळते. शास्त्रानुसार ज्याच्या नाकावर तीळ असते त्यांना ३२ वर्षाच्या नंतर सफलतेचा अनुभव मिळायला सुरुवात होते. हे लोक जॉब करोत अथवा व्यवसाय त्यांना त्यामध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतात. महिलांबद्दल बोलायचे झाले तर ज्या महिलांच्या नाकावर तीळ असते अशा महिला गृह कार्यापेक्षा करियरवर जास्त लक्ष देण्यात अधिक रस घेतात.

तिसरे स्थान

शरीराचे कोणते तिसरे स्थान आहे जिथे तीळ असणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार तळहातावर तीळ असणे शुभ मानले गेले आहे. यामध्ये शुभतेचा परिणाम जास्त प्रमाणत तेव्हा पाहायला मिळतो जेव्हा पुरुषाच्या उजव्या हातामध्ये आणि महिलेच्या डाव्या हातामध्ये तीळ असते. जेव्हा तुम्ही मुठ बंद कराल आणि तीळ मुठीमध्ये बंद होईल तेव्हा अशा व्यक्तीच्या मुठीमध्ये तीळ बंद होत असेल तर अशा व्यक्तीला खूपच लकी मानले जाते. या लोकांच्या आयुष्यामध्ये सर्व काही शुभ घडत असते. त्याचबरोबर असे लोक धनवान देखील होतात. कोणत्याही प्रकारचे कार्य मग ते छोटे असो किंवा मोठे त्यांचे काम लगेच होऊन जाते. लग्नानंतर या लोकांना सासरच्या पक्षाकडून पूर्ण सन्मान मिळतो.

चौथे स्थान

ज्या व्यक्तीच्या पाठीवर तीळ असते अशा व्यक्ती शास्त्रानुसार भाग्यवान मानले गेले आहे. शास्त्रानुसार पाठीवर तीळ असणे खूपच शुभ मानले जाते. अशा व्यक्तीला प्रवासाची खूप आवड असते. हे खूपच रोमँटिक प्रकारचे असण्यासोबतच दुसऱ्यांना खुश ठेवण्याचा देखील प्रयत्न करतात. हे लोक कुटुंबाची काळजी घेणारे आणि कमी वयामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त करणारे असतात. मेहनतीपेक्षा आपल्या वाणीने धन अर्जित करण्याचा गुण या लोकांमध्ये असतो. कुटुंबामधील मुलांचा स्नेह या लोकांना पूर्ण रूपाने मिळतो. आजच्या काळानुसार पाहायला गेले तर कुटुंबाच्या सुखापेक्षा सर्वात मोठे सुख कोणतेही नसेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने