मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. देशातील अरबपती मुकेश अंबानी बद्दल प्रत्येकाला माहिती आहे पण बरेच लोक हा विचार करतात कि मुकेश अंबानीच्या घरामध्ये काम करणाऱ्या नोकरांना किती पगार मिळत असेल. जर तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न येत असेल तर आज आम्ही त्याचे उत्तर देणार आहोत.

देशातील क्वचितच असा व्यक्ती असेल कि ज्याला मुकेश अंबानी बद्दल माहिती नसेल. तथापि अनेक लोकांना मुकेश अंबानी बद्दल माहिती नव्हते पण जेव्हा जियो सीम आणि फोन लाँच झाला तेव्हापासून प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखू लागला.

अंबानी कुटुंबाला त्यांच्या संपत्तीमुळे ओळखले जाते. मुकेश अंबानीचे कुटुंब भारतामधील सर्वात महागड्या घरामध्ये राहते ज्याचे नाव अँटिलिया आहे. ज्या घरामध्ये अंबानी राहतात त्या घराची किंमत जवळ जवळ १ मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. इतक्या मोठ्या घराची काळजी घेण्यासाठी अधिक लोकांची आवश्यकता असणारच.

२७ मजली इमारतीमध्ये राहणारे मुकेश अंबानीच्या घराची देखरेख करण्यासाठी ६०० कर्मचारी काम करतात. या घराच्या सुरक्षेसाठी प्रत्येक महिन्याला जवळपास १५ लाख रुपये इतका खर्च होतो. मुकेश अंबानीची सर्वात मोठी खास गोष्ट हि आहे कि ते आपल्या घरातील नोकरांना नोकर नाही समजत तर आपल्या कुटुंबातील एक सदस्यच समजतात.

जसे ते आपल्या कुटुंबासोबत व्यवहार करतात तसेच आपल्या नोकरांसोबत देखील करतात. माहितीनुसार आधी मुकेश अंबानी यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या नोकरांचा पगार ६००० रुपये प्रती महिना होता पण सध्या तेच लोक २ लाख रुपये इतका पगार घेतात. याशिवाय मुकेश अंबानीच्या घरामध्ये काम करणाऱ्या नोकरांना अनेक इतर सुविधा देखील मिळतात.

जसे जीवन विमा, ई. याशिवाय प्रत्येक नोकर किंवा कर्मचाऱ्याच्या २ मुलांना अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्याची संधी देखील मिळते. आता घसघशीत पगारासोबत इतक्या सुविधा पाहता प्रत्यकजणाला मुकेश अंबानीच्या घरामध्ये काम करायला नक्कीच आवडेल. आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल कि अंबानीच्या घरामध्ये काम करण्यासाठी काय करावे लागेल?

मुकेश अंबानीच्या घरामध्ये काम करण्यासाठी लोकांना एक खास लिखित टेस्ट द्यावी लागते. ज्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट पासून जनरल नॉलेजचे पश्न विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे देणारे लोकच मुकेश अंबानीच्या घरामध्ये काम करण्यासाठी पत्र ठरतात. मुकेश अंबानीच्या घरामध्ये सामन्यात: भारतीय खाद्यपदार्थच बनवले जातात.

पण गेस्टच्या पसंतीनुसार देखील संपूर्ण व्यवस्था केलेली असते. मुकेश अंबानींना जेव्हा नोकरांची आवश्यकता असते तेव्हा वर्तमानपत्रामध्ये बातमी देऊन, टेस्टसाठी लोकांना बोलावले जाते. जे लोक यामध्ये पास होतात त्यांचे नशीबच बदलून जाते. मुकेश अंबानीच्या घरामध्ये नोकर बनने देखील नशिबाची गोष्ट आहे आणि इतके चांगले नशीब खूपच कमी लोकांचे असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने