मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारे महाराष्ट्राचे सुपरस्टार 'सुबोध भावे' यांनी नुकतंच आपलं ट्विटर अकाउंट डिलीट केलं आहे. सुबोधने सोशल मीडियावर स्वतः एक पोस्ट शेअर करत याबाबतची अधिकृत घोषणा केली. सुबोध भावे म्हणाले कि, 'आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद. मी माझा ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा! जय महाराष्ट्र जय हिंद!' या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या सुबोध भावेने अचानक अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय का घेतला असावा? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनाही पडला होता. मात्र त्याने आपल्या चाहत्यांचा हा संभ्रमही दूर केला आहे. एकूणच वाढत्या नकारात्मकतेमुळे हे अकाऊंट तो डिलीट करत असल्याचे समजते. मात्र, या व्यतिरिक्त आणखी कुठलेही कारण अद्याप समोर आलेले नाही.

अनेक सेलिब्रिटींसाठी आणि इन्फ्लूएन्सर्ससाठी सोशल मीडिया त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या, त्यांच्या आयुष्याबद्दल अपडेट्स दिले. सोशल मीडियाचा हा वापर नेहमीच चालू राहील. मात्र लॉकडाऊनच्या काळात 'सोशल डिटॉक्स' हा ट्रेंड देखील काही जणांनी फॉलो केला. अर्थात काही काळासाठी सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसपासून दूर राहणे. काहींना शक्य झालं तर काहींचे जगणच सोशल मीडियाभोवती असल्याने ते अशक्यप्राय होतं.

सध्या सर्व काही सोशल मीडियावर व्यक्त करण्याचा ट्रेंड सुरू असताना मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता सुबोध भावे यांनी ट्विटरला अलविदा केले आहे. सुबोध भावेंनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ट्विटर अकाऊंट डिलिट करत असल्याची माहिती दिली आहे. त्याने असे म्हटले आहे की, 'आपल्या सर्वांच प्रेम आणि आशीर्वाद मिळाला त्याबद्दल धन्यवाद.

मी माझे ट्विटर अकाउंट डिलिट करतो आहे. काळजी घ्या ,मस्त रहा! जय महाराष्ट्र, जय हिंद'. ट्विटरचा कंटाळा आल्याने अकाऊंट डिलिट करत असल्याची माहिती समोर आली आहे. न्यूज वेबसाईटशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते असं म्हणाले आहेत की, 'मी ट्विटरवरून बाहेर पडण्याचं विशेष कारण नाही पण कंटाळा आला आहे. इतर कुठेही वेळ घालवता येईल. त्यामुळे मी ट्विटर सोडत आहे.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामबाबत इतक्यात नाही सांगू शकत पण फेसबुकबाबत देखील असा निर्णय घेऊ शकतो.' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ट्विटरवर सध्या सुबोध भावेंचे ९४.६ हजार फॉलोअर्स आहेत. सुबोध भावेंची ज्याप्रमाणे प्रशंसा केली जाते त्याप्रमाणे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचे शिकार देखील व्हावे लागले आहे, त्यामुळेच त्यांनी ट्विटरला अलविदा केल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने