साउथ इंडियन चित्रपट आणि त्यांच्या फिल्म स्टारची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे. साउथ इंडियन चित्रपटांतील रजनीकांत, चिरंजीवी, प्रभास, अल्लू अर्जुन सारखे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या फॅन फॉलोव्हिंगचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. या कलाकारांच्या लिस्टमध्ये एक असाच कलाकार आहे ज्याचे नाव ममूटी आहे. ममूटी आता ६९ वर्षांचा झाला आहे पण त्याच्या फॅन फॉलोव्हिंगसमोर बॉलीवूडचे दिग्गज कलाकर देखील फिके पडतात.

१९५१ जन्मलेल्या ममूटीचा जन्म केरळच्या एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला होता. तसे तर त्याचे पूर्ण नाव मुहम्मद कुट्टी पनपारम्बिल इस्माइल आहे पण त्याला जास्त करून ममूटी म्हणूनच ओळखले जाते. त्याचे खरे नाव खूपच कमी लोकांना माहिती आहे.

ममूटीला कार्सची खूपच आवड आहे. त्याच्या या आवडीचा अंदाज तुम्ही यावरूनच लावू शकता कि तो एकदा जी कार चालवतो त्यानंतर त्या कारच नंबर पुढच्या वर्षीच येतो. कारण त्याच्या कार्सच्या कलेक्शनमध्ये १०० किंवा २०० नाही तर तब्बल ३६९ कार्सचा समावेश आहे.

मल्याळम आणि तामिळ भाषेमध्ये सुपरहिट चित्रपट देणाऱ्या ममूटी स्वतःची कार चालवणे जास्त पसंत करतो. आपल्या कार्ससाठी त्याने वेगळे गॅरेज बनवले आहे. तसे तर असे नाही कि त्याला फक्त महागड्या गाड्या आवडतात. त्याच्या कारच्या कलेक्शनमध्ये महागड्या गाड्यांपासून ते सर्वात स्वस्त गाड्या देखील सामील आहेत.

असे सांगितले जाते कि साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऑडी ब्रँडची कार खरेदी करणारे पहिले ममूटीच होते. याशिवाय स्वदेशी कार मारुती देखील आवडत्या कार्सपैकी एक आहे. असे यामुळे कारण कि त्यांची सर्वात पहिली कार मारुती होती. नुकतेच त्यांनी देशातील पहिली मारुती ८०० खरेदी केल्याचे सांगितले होते.

त्यांच्या कार्स कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या ताफ्यामध्ये फेरारी, मर्सिडीज, ऑडी, पोर्शचे अनेक मॉडल, मिनी कूपर एस, एफ १० बीएमडब्ल्यू ५३० डी आणि ५२५ डी, ई ४६ बीएमडब्ल्यू एम ३, फोक्सवैगन पासॅट एक्स २, मित्सुबिशी पाजेरो स्पोर्ट, टोयोटा फॉर्च्यूनर टोयोटा लँड क्रूझर एलसी २०० आणि अनेक एसयुव्ही सामील आहेत. ममूटीजवळ आयशरची एक कस्टमाइज्ड कॅराव्हॅन देखील आहे.

माहितीनुसार त्यांच्या कार कलेक्शनची लेटेस्ट कार जग्वार एक्सजे-एल कॅव्हियार आहे. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि या कारसाठी ते इतके वेडे आहेत कि त्यांनी या कारचे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हर्जन खरेदी केले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने