देशाचे शूर जवान शशी धारण नायर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नायर एलओसीवर देशाची रक्षा करताना शहीद झाले. अशामध्ये आज या शूर सैनिक आणि त्यांच्या पत्नी तृप्ती यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत. नायर आणि त्यांनी पत्नी तृप्तीची स्टोरी खूपच रंजक आहे. या दोघांची भेट पुण्यामध्ये एका कॉमन मित्राद्वारे झाली होती. पहिला ते चांगले मित्र बनले आणि नंतर दोघांना एकमेकांवर प्रेम झाले. यानंतर त्यांनी लवकरच एंगेजमेंट देखील केली. त्यावेळी तृप्ती कम्प्युटर अॅप्लीकेशनमध्ये प्रोफेशनल मास्टर होती तर नायर कप्तानच्या पदावर कार्यरत होते.

एंगेजमेंटच्या ८ महिन्यानंतर तृप्तीला मल्टीपल आर्टिरिओस्क्लेरोसिसचा आजार झाला. या आजाराने तिला व्हीलचेयरवर बसवले. या घटनेनंतर समाजातील अनेक लोकांनी नायर यांना सल्ला दिला कि त्यांनी हे लग्न कँसल करावे. पण नायर तृप्तीवर खर प्रेम करत होते, यामुळे त्यांनी तृप्तीसोबत एंगेजमेंटनंतर लग्नाचे वचन देखील पाळले आणि दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले.

लग्नाच्या काही महिन्यानंतर तृप्तीला पॅरालिसिसचा अटॅक आला ज्यामुळे तिच्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे निकामी झाला. तथापि या समस्येचा स्वीकार देखील नायर आणि त्यांची पत्नी तृप्ती यांनी हसत हसत स्वीकार केला आणि आनंदाने राहू लागले. सध्या त्यांची हि लव्हस्टोरी आर्मीमध्ये खूपच फेमस आहे. हे दोघे प्रत्येक पार्टी आणि इवेंटला एकत्र अटेंड करत होते. अनेक वेळा तर नायर स्वतः तृप्तीची व्हील चेयर ढकलत न्यायचे.

मेजर नायर यांची नौशेराच्या एलओसीवरवर पोस्टिंग झाली होती आणि त्यांना २ जानेवारीला जॉईन व्हायचे होते. अशामध्ये याआधी त्यांनी एका महिन्याची सुट्टी घेतली आणि हा पूर्ण काळ त्यांनी आपल्या पत्नीसोबत पुण्यामध्ये घालवला. तृप्तीला नेहमी नायर यांच्या सेफ्टीबाबतीत चिंतिती असायच्या. अशामध्ये नायर यांनी जाण्यापूर्वी आपल्या पत्नीला वचन दिले कि ते नक्कीच परत येतील. यादरम्यान ते पुन्हा परत जरूर आले पण तिरंग्यामध्ये लपेटलेल्या अवस्थेत.

वास्तविक ११ जानेवारी २०१९ रोजी नायर यांनी एलओसीवर एक युद्ध लढले जिथे एका द-ह-श-त-वा-दी स्फो-टा दरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि ते शहीद झाले. यानंतर नुकतेच त्यांचा मृतदेह तिरंग्यामध्ये गुंडाळून नॅशनल मेमोरियल पुणे येथे आणला गेला जिथे पूर्ण सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान नायर यांची पत्नी तृप्ती व्हीलचेयरवर तिथे आली आणि त्यांनी आपल्या पतीला शेवटचा निरोप दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने