परदेस, दाग- द फायर, धड़कन सारख्या चित्रपटांमधून लाखो प्रशंसक बनवणारी अभिनेत्री महिमा चौधरी आज पुन्हा चर्चेमध्ये आली आहे, वास्तविक ती शेयर चॅट सहित इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर खूपच पॉपुलर होत आहे. महिमाचे नाव ऐकताच चित्रपट प्रेमींना परदेस चित्रपटाची आठवण येते. ज्यामध्ये एक सुंदर मुलीच्या भुमिकेमध्ये ती पाहायला मिळाली होती. तथापि आज सत्य काही वेगळेच आहे. आज महिमा चौधरी आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

वजन वाढले आहे

काही महिन्यांपूर्वी महिमाचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अभिनेत्रीचे वजन खूपच वाढलेले दिसत होते. ती पहिल्यापेक्षा खूपच वेगळी दिसत होती. बरेच दिवस महिमा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली नाही.

वैयक्तिक आयुष्य

महिमाचे वडील भारतीय होते आणि तिची आई नेपाळी होती. तिचा जन्म दार्जीलिंगमध्ये झाला होता. दार्जीलिंगमध्ये एका सौंदर्य स्पर्धेमध्ये जिंकल्यानंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली आणि नंतर तिने चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. १९९० मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केला, नंतर अॅड चित्रपटांमध्ये आपले स्थान पक्के करण्यास सुरुवात केली, तिला सफलता देखील मिळाली आणि ती अनेक जाहिरातींमध्ये देखील पाहायला मिळाली.

व्हिडिओ जॉकीचे काम

यानंतर महिमाने व्हिडिओ जॉकीचे काम देखील केले. तथापि तिच्या नशिबामध्ये काही वेगळेच लिहिले होते. हेच नशीब तिला चित्रपट निर्माता सुभाष घईच्या जवळ घेऊन आले. सुभाष तेव्हा आपल्या परदेस चित्रपटासाठी एका नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. त्याने तब्बल तीन हजार ऑडिशन घेतले पण त्याला कोणी पसंत आले नाही. जेव्हा महिमा समोर आली तेव्हा त्याला परदेस चित्रपटाची हिरोईन मिळाली. पण सुभाषने महिमाला असेच एक्सेप्ट केले नाही, फिल्मी जगताच्या बाहेर रितू चौधरी नावाने ओळखली जाणाऱ्या महिमाला सुभाष घईनेच हे नाव दिले होते.

वैयक्तिक आयुष्यात उतार-चढाव

महिमा चौधरीच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक उतार-चढाव आले. तिने काही वर्षे टेनिस खेळाडू लिअँडर पेसला डेट केले होते. नंतर लिअँडर पेसने महिमा चौधरीला सोडून रिया पिल्लईसोबत लग्न केले. यानंतर महिमाच्या आयुष्यामध्ये बॉबी मुखर्जी आला, दोघांनी लग्न केले, दोघांना एक मुलगी देखील आहे, पण दोघेही घटस्फोट घेऊन आता वेगळे झाले आहेत. आता महिमा आपल्या मुलीसोबत राहते, ती सिंगल मदर बनून आयुष्य जगत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने