मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत आपली ओळख बनवणारी सना सईद २२ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करते. सनाने मोठ्या पडद्यावर शाहरुख खान, काजोल आणि रानी मुखर्जीचा कुछ कुछ होता है सुपरहिट चित्रपटामध्ये शाहरुखच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये तिच्या भूमिकेचे नाव अंजली होते. तिची हि भूमिका संस्मरणीय भूमिका ठरली होती.

सना सईदचा जन्म २२ सप्टेंबर १९८८ रोजी मुंबईमध्ये झाला होता. तिने आपले संपूर्ण शिक्षण मुंबईमध्ये केले. सना सईद कुछ कुछ होता है चित्रपटामध्ये पहिल्यांदा बालकलाकार म्हणून पाहायला मिळाली होती. हा चित्रपट १९९८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामधील तिच्या भुमिकेचे खूपच कौतुक झाले होते. कुछ कुछ होता है चित्रपटानंतर सना सईदने हर दिल जो प्यार करेगा आणि बादल चित्रपटामध्ये देखील बालकलाकार म्हणून काम केले होते.

यानंतर तिने टीव्ही सिरियल्समध्ये देखील काम केले. सना सईद २००८ मध्ये बाबुल का आंगन छूटे न आणि लो हो गई पूजा इस घर की या सिरियल्समध्ये पाहायला मिळाली होती. छोट्या पडद्यावर देखील तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक केले गेले. याशिवाय तिने झलक दिखला जा ६, झलक दिखला जा ७, नच बलिए ७ आणि झलक दिखला जा ९ या सारख्या अनेक रियालिटी शोजमध्ये देखील काम केले.

२०१२ मध्ये सना सईदने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. ती करण जौहर द्वारे दिग्दर्शित स्टूडेंट ऑफ द ईयर चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये सना सईद आपल्या हॉट चिक लुकमुळे खूपच चर्चेमध्ये राहिली होती. स्टूडेंट ऑफ द ईयर चित्रपटामध्ये सनासोबत वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेमध्ये होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने