केजीएफ चित्रपटामधून अमाप लोकप्रियता मिळवलेला अभिनेता यश साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार आहे. अभिनेता यशच्या केजीएफ चॅप्टर १ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने छप्पर फाड कमाई केली होती. कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. केजीएफ चित्रपटाच्या हिंदी वर्जनने देखील चांगलीच कमाई केली होती.

अभिनेता यशचे चित्रपट भलेहि २०० करोड रुपये पेक्षा जास्त कमाई करत असतील पण त्याचे वडील आज देखील बस ड्रायव्हर आहेत. त्याच्या वडिलांचे नाव अरुण कुमार आहे. वडिलांचे मानणे आहे कि या व्यवसायामुळेच ते आपल्या मुलाला स्टार बनवू शकले आहेत त्यामुळे ते म्हणाले कि मी हे काम सोडू शकत नाही.

अभिनेता यशचा जन्म कर्नाटकमध्ये झाला होता. त्याचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. यशने आपल्या करियरची सुरुवात टीव्ही सिरीयल नंदा गोकुल मधून केली होती. २००७ मध्ये जांबाडा हुडुगी चित्रपटामधून त्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. तथापि या चित्रपटामध्ये त्याची दुय्यम भूमिका होती.

यशच्या फिल्मी करियरला आता १२ वर्षांपेक्षा जात काळ झाला आहे. त्याने आतापर्यंत १८ चित्रपटांमध्ये काम केले आहे. यशच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याची एकूण संपत्ती ४० करोड पेक्षा जात आहे. तो ३ करोडच्या बंगल्याचा मालक आहे. अभिनेता यश एका चित्रपटासाठी ५ करोड रुपये चार्ज करतो. नुकतेच केजीएफ चॅप्टर १ चित्रपटामध्ये तो पाहायला मिळाला होता. सध्या तो केजीएफ चॅप्टर २ चित्रपटाच्या तयारीमध्ये आहे.

यशच्या पत्नीने नाव राधिका राधिका पंडित आहे. अभिनेता यश आणि राधिका ९ डिसेंबर २०१६ रोजी लग्नाच्या बंधनामध्ये अडकले होते. त्यांची पहिली भेट नंदगोकुल टीव्ही सिरीयलच्या सेटवर झाली होती आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. दोघेही मिस्टर आणि मिसेस रामचरी चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळाले होते. यश आणि राधिका दोन मुलांचे आईवडील आहेत. अभिनेता यशला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने