आयुष्यामध्ये बरीच धावपळ होत असते आणि या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकजण पैशाच्या मागे लागलेला असतो. प्रत्येकाची इच्छा असते कि त्याची पर्स कधीच रिकामी राहू नये. नेहमी पर्स भरलेली असावी. आपल्या आरोग्याची काळजी न घेता तो नेहमी प्रयत्न करत असतो. पण अनेक प्रयत्न करून देखील पैसे कमावण्यात अनेक अडचणी येतात. महिन्याच्या सुरुवातीला लोकांजवळ पैसा राहतो पण महिन्याच्या शेवटी पर्स रिकामी होते आणि आपल्याला पैशासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.

प्रत्येक व्यक्ती स्वतःजवळ पर्स नक्की ठेवतो आणि पर्समध्ये व्यक्ती पैशासोबत कोणतीना कोणती वस्तू जरूर ठेवतो. या वस्तू आपल्या आयुष्याला प्रभावित करतात. वास्तविक पर्समध्ये ठेवलेल्या काही वस्तू आपल्यासाठी भाग्यशाली असू शकतात. यामुळे आयुष्यामध्ये बरकत राहते. या वस्तू आपल्यासाठी चांगल्या सिद्ध होतात आणि काही वस्तूंपासून आपल्याला मोठा फायदा मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंची माहिती देणार आहोत ज्या जर पर्समध्ये ठेवल्या तर त्याचा चांगला फायदा मिळू शकतो. जर तुम्हालाहि वाटत असेल कि आपली पर्स नेहमी भरलेली असावी तर या वस्तू आपल्या पर्समध्ये जरूर ठेवा.

पर्समध्ये ठेवा या वस्तू

१. शास्त्रानुसार श्री यंत्राला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. जर तुम्हालाहि वाटत असेल कि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहावी तर आपल्या पर्समध्ये छोट्या आकाराचे श्रीयंत्र जरूर ठेवावे. यामुळे आपल्याला शुभ फळ प्राप्ती होईल. धर्म ग्रंथामध्ये देखील श्री यंत्राच्या महिमेबद्दल उल्लेख केला गेला आहे पण हि गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि श्री यंत्र आपल्या पर्समध्ये ठेवण्यापूर्वी याची विधिवत पूजा अवश्य करावी.

२. पर्समध्ये तुम्ही धनाची देवी माता लक्ष्मीचा एक फोटो अवश्य ठेवा यामुळे तुमच्या आयुष्यावर शुभ प्रभाव पडतो. जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये माता लक्ष्मीचा फोटो ठेवला तर यामुळे बरकत येते आणि तुमची पर्स कधीच रिकामी होती नाही. जर पर्समध्ये ठेवलेला माता लक्ष्मीचा फोटो फाटला तर तो फोटो नदीमध्ये प्रवाहित करावा आणि नवीन फोटो ठेवावा.

३. पिंपळाचे पान पर्समध्ये ठेवणे खूपच शुभ मानले गेले आहे. अभिमंत्रित पिंपळाचे पान पर्समध्ये ठेवावे. कोणताही शुभ मुहूर्त पाहून तुम्ही पिंपळाचे पान तोडा आणि ते गंगाजलने धुऊन पवित्र करा आणि यावर केसरने श्री लिहून आपल्या पर्समध्ये ठेवा.

४. माता लक्ष्मीच्या पूजेदरम्यान जे तांदूळ अर्पित केले जाते तुम्ही एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून आपल्या पर्समध्ये ठेवावे. जर तुम्ही असे केले तर यामुळे शुक्र ग्रह आणि धनाची देवी माता लक्ष्मी संबंधित अनुकूल फळ प्राप्ती होते.

५. अनेक लोकांना तुम्ही पाहिले असेल कि आपल्या पर्समध्ये गुरुचा एक छोटा फोटो ठेवतात. गुरुचा फोटो पर्समध्ये ठेवल्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक प्रभाव पडतो आणि आपले मन शांत राहते. गुरुचा फोटो आपल्या पर्समध्ये ठेवल्याने धना संबंधी समस्या उत्पन्न होत नाहीत.

६. आपल्या पर्समध्ये धनाची देवी माता लक्ष्मी संबंधित वस्तू जसे गोमती चक्र, समुद्री कवडी, चांदीचे नाणे ई. ठेवावे कारण या वस्तू माता लक्ष्मीला खूप पसंत आहेत. जर तुम्ही या वस्तूंपैकी एक वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवली तर यामुळे शुभ फळ प्राप्ती होते. या वस्तू पर्समध्ये ठेवण्यापूर्वी थोडा वेळ माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवाव्या आणि त्यानंतर श्रद्धापूर्वक आपल्या पर्समध्ये ठेवाव्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने