बॉलीवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रनौत काही दिवसांपासून खूपच चर्चेमध्ये आहे. मुंबईची तुलना पोकशी केल्यानंतर कंगना आणखीनच चर्चेमध्ये आली. काही दिवसांपूर्वी बीएमसीने जेव्हा तिच्या ऑफिसवर कारवाई केली तेव्हा कंगना मुंबईला पोहोचली होती.


त्यानंतर ती पुन्हा मनालीला रवाना झाली. सध्या कंगना आपल्या घरामध्ये क्वारंटीन आहे. मनालीमध्ये तिचा खूपच सुंदर आणि आलिशान बंगला आहे. लॉकडाऊन पासूनच अभिनेत्री आपल्या मनाली स्थित घरामध्ये आहे. चला तर तिच्या आलिशान बंगल्याचे फोटो पाहूयात.


अभिनेत्री कंगनाने आपल्या बंगल्याचे फोटो सोशल मिडियावर देखील शेयर केले आहेत. घराच्या इंटरेरियरवर खास लक्ष देण्यात आले आहे. डोंगरांमध्ये वसलेल्या कंगनाच्या घराच्या आतमधून देखील निसर्गाचा सुंदर देखावा पाहायला मिळतो. कंगनाच्या बेडरूमला क्लासिकल टचसोबत मॉडर्न लुक दिला गेला आहे. त्याचबरोबर आर्मचेयर आणि जयपुर रग्स कार्पेट देखील ठेवले गेले आहेत. तर मुंबईच्या बाजारपेठेतून खरेदी केलेले कस्टमाइज्ड आर्ट पीस भिंतींवर बसविण्यात आले आहेत. बेडरूमच्या प्रवेशद्वारावर अनोखे आइटम्स लटकवले गेले आहेत.

कंगनाच्या घरामध्ये एकूण आठ बेडरूम आहेत. अतिथींचे बेडरूम ऑरेंज लेनने डिझाईन केले गेले आहेत. यामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. घराच्या सर्व खोल्या दुबई स्टाईलने बनवल्या आहेत. सजावटीसाठी देशातील अनेक राज्यांमधून सामान मागवले गेले आहे.

कंगनाचा जेव्हा क्वीन चित्रपट हिट झाला होता तेव्हा तिने विचार केला होता कि मनालीमध्ये एक आलिशान घर असावे. तिने २०१८ च्या नवीन वर्षाच्या निमित्ताने इथे गृह प्रवेश केला होता. बंगल्याच्या डायनिंग रूमसोबत फायर प्लेस आणि जिम देखील आहे. कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला होत्या ज्यामध्ये ती वर्कआउट करताना दिसली होती. घरामध्ये कंगनाने योगा रूम देखील बनवली आहे.


कंगनाच्या घराच्या छतावर टॉप ग्लास रूफ लावला आहे. बंगला बनवण्यासाठी एकूण ३० करोड रुपये खर्च करण्यात आले होते. कंगनाने १० करोडमध्ये जमीन खरेदी केली होती आणि नंतर आपल्या पसंतीने इथे घर बनवून घेतले. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर कंगनाचे वडील अमरदीप रनौत एक बिजनेसमॅन आहेत. तिची आई आशा रनौत शिक्षिका आहे. कंगनाला एक मोठी बहिण आहे जिचे नाव रंगोली चंदेल आहे. रंगोली कंगनाची मॅनेजरदेखील आहे. कंगनाला एक छोटा भाऊ आहे ज्याचे नाव अक्षत रनौत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने