बॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट कभी अलविदा ना कहना मध्ये शाहरुख खानच्या मुलाची भूमिका साकारणारा बालकलाकार माहिती आहे का?. हा छोटा बालकलाकार आज खूपच लोकप्रिय झाला आहे. सध्या त्याने टीव्ही आणि वेब सिरीजमधून लाखो लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. पण या क्युट छोट्या मुलाबद्दल एक रंजक गोष्ट खूपच कमी लोकांना माहिती आहे.

या चित्रपटामध्ये मुलाची भूमिका साकारणारा हा बालकलाकार एक मुलगा नाही तर एक मुलगी होती, हि फीमेल चाईल्ड आर्टिस्ट आता खूपच लोकप्रिय झाली आहे. या अभिनेत्रीने फक्त शाहरुखसोबत नाही तर अनेक मोठ्या कलाकारांसोबत मोठ्या चित्रपटांमध्ये मुलाची भूमिका साकारली आहे. या अभिनेत्रीचे नाव एहसास चन्ना असे आहे. सध्या ती टीव्हीएफ या यूट्यूब चॅनलसाठी काम करत आहे. टीव्हीएफच्या अनेक वेब सिरीजमध्ये ती पाहायला मिळाली आहे. तिच्या अॅक्टिंगला खूपच पसंत केले जाते.

अभिनेत्री एहसास चन्नाने वयाच्या ४ थ्या वर्षी अभिनय करण्यास सुरुवात केली होती. तिचा डेब्यू चित्रपट वास्तु शास्त्र होता. या चित्रपटामध्ये त्याने प्रभावी अभिनय केला होता. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटामध्ये सुष्मिता सेन देखील होती. चित्रपटामध्ये तिचे नाव रोहन होते. याशिवाय ओ माई फ्रेंड गणेशा चित्रपटामधून देखील एहसास चन्नाला खूपच लोकप्रियता मिळाली होती.

एहसासने अनेक फेमस टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. देवों के देव महादेवमध्ये एहसासने भगवान शंकराची लहान मुलगी अशोकासुंदरीची भूमिका साकारली होती. याशिवाय एहसासने मधुबाला - एक इश्क एक जुनून, क्राइम पेट्रोल, गंगा आणि कोड रेड – तलाश सारख्या शोजमध्ये देखील काम केले आहे. वयाच्या १६ व्या वर्षी एहसासने डिजिटल डेब्यू केला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने