मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. त्यांचे घर अँटिलिया हे मुंबईतील सर्वात सुंदर इमारतींपैकी एक आहे. जर तुम्ही त्याची किंमत जाणून घ्याल तर तुम्ही देखील चकित व्हाल. पण अंबानी एकटेच नाहीत तर सुंदर आणि आलिशान घरांच्या लिस्टमध्ये देशातील अनेक बिजनेसमॅनची घरे देखील सामील आहेत. सामान्य लोक जिथे काही लाखांची घरे देखील आयुष्यभरामध्ये बनवू शकत नाहीत तितके हे बिजनेसमॅन करोडोंच्या घरांमध्ये राहतात.

मुकेश अंबानी आणि अनिल अंबानीमुकेश अंबानी जवळ जवळ १२ हजार करोडच्या सुंदर २७ माजली अँटिलियामध्ये राहतात. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार या घराची किंमत २ बिलियन डॉलर म्हणजे १२ हजार करोड रुपये इतकी आहे. मुकेश अंबानीचे लहान भाऊ अनिल अंबानीच्या घराची किंमत देखील हैराण करणारी आहे. अनिल मुंबईच्या पाली हिलमध्ये राहतात. हि बिल्डींग ६६ मीटर उंच आहे. अनिल अंबानीच्या घराची किंमत ५ हजर करोड रुपये इतकी आहे.

रतन टाटा

देशातील चर्चित उद्योगपती रतन टाटांचा बंगला मुंबईच्या कुलाबा येथे आहे. ३ मजली पॅलेटियल हाऊस जवळ जवळ १५००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे. त्यांच्या घराची किंमत जवळ जवळ १२५-१५० करोड रुपये आहे.

गौतम सिंघानिया

रेमंड ग्रुपचे मालक गौतम सिंघानियाचे मालाबार हिल्स येथे ३६ माजली जेके हाऊस आहे. या बिल्डींगमध्ये असलेल्या लक्झरीबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये स्विमिंग पूल पासून जिम, स्पा, म्यूजियम आणि हेलिपॅडपर्यंत सर्व सुविधा आहेत. याची एकूण किंमत जवळ जवळ ७१०० करोड रुपये इतकी आहे.

विजय माल्या

भारतातून फरार असलेल्या विजय माल्याचे बंगळुरूमध्ये एक आलिशान पेंट हाऊस आहे जे ३५ माजली आहे. या अपार्टमेंटची किंमत जवळ जवळ १३० करोड रुपये पेक्षा जास्त सांगितली जाते. हे स्काय मेशन ४० हजार स्क्वेअर फूटमध्ये बनले आहे. येथून बंगळुरु शहराचा प्रत्येक भाग सहज पाहता येतो.

नवीन जिंदल

हरियाणवी उद्योगपती नवीन जिंदल यांचे वडील ओम प्रकाश जिंदल हे एक स्टील उद्योगपती होते. नवीन यांना फक्त महागड्या कारचीच नाही तर घोडेस्वारीची देखील आवड आहे. त्यांचे आलिशान घर दिल्लीच्या लुटियन झोनमध्ये आहे. याची किंमत १२५ करोड ते १५० करोड रुपये इतकी सांगितली जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने