आचार्य चाणक्य एक कुशल राजकारणी होते. राजकारण आणि आपल्या तल्लख धोरणांमुळे त्यांना कौटिल्य देखील म्हंटले जाते. चाणक्यने आपल्या चाणक्य नीतिमध्ये काही अशा गोष्टींचे वर्ण केले आहे, जे जर जीवनामध्ये अवलंबल्यास आयुष्य पूर्णपणे बदलेल. चाणक्यने जीवनासंबंधी अनेक नितींचे वर्णन केले आहे, यामध्ये काही नीति अशा आहेत ज्या पुरुषांसाठी सांगितल्या गेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला त्याच नितींबद्दल सांगणार आहोत.

स्त्रीचे चारित्र्य ठेवा आपल्यापर्यंत

एक समजदार व्यक्तीने कधीच आपल्या पत्नीचे चारित्र्य किंवा तिच्या व्यवहाराबद्दल कोणालाही सांगू नये. एक सुखी वैवाहिक आयुष्यासाठी पत्नीच्या चांगल्या किंवा वाईट चारित्र्याला आपल्यापर्यंतच ठेवले पाहिजे. जर पत्नीचे चारित्र्य चांगले नाही तर चुकुनही कोणाच्यासमोर याचा उल्लेख करू नये, हे तुमच्या पत्नीच्यासोबत तुमच्या बदनामीचे कारण बनते.

आधीच सांगू नये आपले मत

तुम्ही पाहिले असेल कि नेहमी म्हंटले जाते कि महिलांना त्यांच्या वयाबद्दल विचारू नये, त्याचप्रकारे कधीही पुरुषाला त्याच्या सॅलरीबद्दल विचारू नये. अनेक वेळा याला असभ्य मानले जाते कारण नेहमी समाजामध्ये लोकांना हे पाहून आदर दिला जातो कि त्याची सॅलरी किती आहे, अशामध्ये अनेक वेळा असे प्रश्न समोरच्याला अस्वस्थ करतात.

तुमचे नुकसान/फायदा ठेवा तुमच्यापर्यंत

जर कधी व्यापरामध्ये नुकसान होण्याची परिस्थिती उद्भवली असेल आणि तुम्हाला नुकसान सहन करावे लागत आहे तेव्हा कधीही याचा उल्लेख आपले मित्र, नातेवाईक यांच्यासमोर करू नये, कारण तुमच्या अशा स्थितीमध्ये तुमची कोणी मदत करणार नाही. संकटामध्ये नेहमी सर्वजण आपले हात आकडते घेतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने