हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस कोणत्याना कोणत्या देवी-देवतांसाठी समर्पित असतो. शनिवारचा दिवस न्यायाची देवता मानली जाणारी शनिदेवाचा मानला जातो. शनिदेवाचा बीज मंत्र आहे ‘शनि शमयते पापम्’ म्हणजे शनिदेव आपली पापे हरतील. शनिदेव सूर्याचे पुत्र आणि भगवान शंकराचे शिष्य आहेत. यांना क्रोधाची देवता देखील म्हंटले जाते. असे म्हंटले जाते कि जर शनिदेव एखाद्यावर क्रोधीत झाले तर त्यांच्यापासून कोणीही वाचू शकत नाही. यामुळे लोक प्रत्येक शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची कृपा ज्याच्यावर होते त्यांना दुखामधून मुक्ति मिळते आणि आयुष्य आनंदाने भरून जाते.

स्वच्छ मनाने जर शनिदेवाची पूजा केली तर त्यांची कृपा बनून राहते. तुमच्या आयुष्यामध्ये जर शनीची साडेसाती चालू असेल तर कोणते काम करण्यास अडचण येत असेल किंवा काम होता होता राहत असेल तर शनिदेवाच्या पूजेने तुम्हाला लाभ होऊ शकतो. फक्त इतकेच नाही तर शनिदेवाची सवारी देखील आपल्याला दिवसाच्या सुरुवातीला दिसली तर त्यामुळे आपल्या दिवसामध्ये खूप फरक पडतो.

तुम्ही देखील शनिदेवाला प्रसन्न करू इच्छित असाल तर हे उपाय जरूर करून पहा

१. जर तुमच्यावर शनिदेवाची कृपा नेहमी बनून राहावी असे वाटत असेल तर तुम्ही ११ शनिवार पर्यंत पिंपळाच्या झाडाच्या खाली मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि ऊँ शनै शनिश्चरै नमः या मंत्राचा जाप ११ वेळा करावा. यामुळे तुमची सफलता सुनिश्चित होईल आणि शत्रूंवर विजय निश्चित मिळेल.

२. प्रत्येक शनिवारी तेल दान करावे. तेल दान करण्यासाठी एका वाटीमध्ये तेल घ्या आणि त्या तेलामध्ये आपला चेहरा पाहून ते दान करा.

३. घरामध्ये खुशहाली टिकून राहण्यासाठी कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदरपणा बनून राहण्यासाठी शनिवारच्या दिवशी आपल्या वजनाइतके मोहरीचे तेल गौशाळेमध्ये दान करावे. लवकरच घरामध्ये सुख-समृद्धी येईल.

४. इच्छित असल्यास काळ्या घोड्याच्या नाळेपासून बनलेला छल्ला देखील मधल्या बोटामध्ये धरण करू शकता. हा छल्ला शनिवारच्या दिवशी धारण केला पाहिजे.

५. काही कारणास्तव तुमच्या शिक्षणामध्ये बाधा उत्पन्न होत असेल तर शनिवारच्या दिवशी उंबराच्या झाडाला दुध अर्पण करावे. शिक्षणासंबंधित तुमच्या समस्या लवकरच दूर होतील.

६. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी हनुमानजीची पूजा केली पाहिजे. असे म्हंटले जाते कि शनिदेवाने एकदा हनुमानजीला वचन दिले होते कि ते हनुमानजीची पूजा करणाऱ्यांना कोणतेही कष्ट देणार नाहीत. यामुळे शनीच्या दोषापासून वाचण्यासाठी शनीसोबत हनुमानजीची पूजा देखील करायला हवी.

७. प्रत्येकजण शनीच्या साडे-सातीपासून वाचू इच्छितो. यापासून वाचण्यासाठी २१ शनिवार शनिदेवाला काळे तीळ अर्पण करावे आणि २१ मंगळवार हनुमानजीवर चमेलीचे तेल अर्पण करावे. शनिदेवाची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने