टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय सिरीयलमध्ये सामील तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये दया बेनची भूमिका साकारणारी दिशा वकानीला प्रत्येक घरामध्ये ओळखले जाते. अधून मधून शोमध्ये दिशा वकानीची पुन्हा एंट्री होणार असल्याच्या बातम्या येत असतात.

दरम्यान एका मुलाखतीमध्ये दिशा वकानीला विचारले गेले होते कि तिला कोणासोबत व्हॅलेंटाईन डेटवर जायला आवडेल. तेव्हा तिने महानायक अमिताभ बच्चनचे नाव घेतले होते. तिने म्हंटले होते कि महानायकसोबत काम करने हे तिचे स्वप्न आहे आणि तिला एक दिवस त्यांच्यासोबत डिनर डेटवर जायचे आहे.

दिशा वकानीची हि मुलाखत २०१४ मधील आहे. तेव्हा तिच्यासोबत तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये बबिताची भूमिका करणारी मुनमुन दत्तादेखील होती. दरम्यान दिशा आणि मुनमुनला एक असा बॉलीवूड अभिनेता निवडण्यास सांगितले गेले होते, ज्याच्यासोबत त्या डेट वर जाऊ इच्छित होत्या. मुनमुनने आपल्या पसंतीच्या बी टाउन मित्रांपैकी एक नाही तर तीन नावे घेतली होती आणि ती तीन नावे सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि रणबीर कपूर होती.

तर दिशाने सर्वात पहिला आपल्या आईची व्हॅलेंटाईन म्हणून निवड केली पण बॉलीवूड अभिनेत्याबद्दल बोलताना तिने रणबीर कपूर आवडत असल्याचे सांगितले. यादरम्यान दिशा वकानीने आपल्या लाईफमधील पहिल्या क्रशचा खुलासा देखील केला. तो कोणी दुसरा तिसरा नव्हता तर शाहरुख खान होता. ज्याच्यासोबत तिने देवदास सारख्या चित्रपटामध्ये काम केले होते. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटामध्ये देखील दिशा पाहायला मिळाली होती. चित्रपटामध्ये शाहरुख आणि काजोलची जोडी आजदेखील खूप लोकप्रिय आहे.

दरम्यान अशी बातमी समोर आली आहे कि दिशा वकानी बिग बॉसच्या घरामध्ये अतिथी बनू शकते. मिडिया रिपोर्ट्सनुसार दिशा वकानीला बिग बॉसकडून ऑफर मिळाली आहे. तथापि अभिनेत्रीने अजूनपर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने