भारतामध्ये सर्वात जास्त पैसा जर कोणत्या खेळामध्ये आहेत तर तो खेळ आहे क्रिकेट. भारतामध्ये इतर खेळांच्या तुलनेत क्रिकेटमध्ये पैशांची कोणतीही कमी नाही. जर तुम्हाला चांगले क्रिकेट खेळता येत असेल तर. आजच्या काळामध्ये भारतीय क्रिकेटर्सजवळ पैशांची कोणतीही कमतरता नाही, तरीही भारतातील असे अनेक क्रिकेटर्स देखील आहेत जे सरकारी नोकरी करत आहेत. यामध्ये बहुतेक क्रिकेटर्स हे आर्मीमध्ये आणि पोलीस विभागात आहेत.

१. कपिल देव - (लेफ्टनंट कर्नल, इंडियन टेरिटोरियल आर्मी)

भारताला पहिल्यांदाच आपल्या नेतृत्वाखाली विश्वविजेता बनवणाऱ्या कपिल देवला २००८ मध्ये इंडियन टेरिटोरियल आर्मी या लेफ्टनंट कर्नलची मानद रँक देण्यात आली होती. कपिल देव देशातील पहिला क्रिकेटर आहे ज्याला इंडियन टेरिटोरियल आर्मीने मानद रँक दिली आहे.

२. सचिन तेंडुलकर - (ग्रुप कॅप्टन, इंडियन एअर फोर्स)

क्रिकेटमधला देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरला २०१० मध्ये इंडियन एयर फ़ोर्सने ग्रुप कॅप्टनची मानद रँक दिली होती. सचिन इंडियन एयर फ़ोर्समध्ये ग्रुप कॅप्टन बनणारा पहिला क्रिकेटर आहे. सचिन गेल्या वर्षी ८७ व्या एयर फ़ोर्स डेच्या निमित्ताने ड्रेस घालून गाझियाबादमधील हिंडन एअर बेसवर पोहोचला होता.

३. महेंद्रसिंग धोनी - (लेफ्टनंट कर्नल, इंडियन टेरिटोरियल आर्मी)

इंडियन टेरिटोरियल आर्मीने २०११ मध्ये भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लेफ्टनंट कर्नलची मानद रँक दिली होती. तो तेव्हापासून टेरिटोरियल आर्मीशी जोडला गेला आहे. सुट्टींमध्ये कोणत्याही ट्रीपवर न जाता धोनी ट्रेनिंगसाठी आपल्या १०६ इन्फंट्री बटालियनमध्ये प्रशिक्षणासाठी जात होता.

४. हरभजन सिंग- (डीएसपी, पंजाब पोलिस)

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकीपटू हरभजन सिंगला २०१३ मध्ये डीएसपीची नोकरी देण्यात आली होती. भारतासाठी त्याने १०३ टेस्ट आणि २३६ वनडे आणि २८ टी-२० सामने खेळले आहेत आणि त्याने एकूण ७७१ बळी घेतले आहेत.

५. केएल राहुल- (असिस्टंट मॅनेजर, आरबीआय)

टीम इंडियाचा स्टाइलिश ओपनर केएल राहुलबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे कि तो आरबीआईमध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. आरबीआईने राहुलला हि नोकरी २०१८ मध्ये दिली होती. राहुलला तुम्ही आरबीआईच्या जाहिरातींमध्ये देखील पाहिले असेल.

६. जोगेंद्र शर्मा- (डीएसपी, हरियाणा पोलिस)

आपल्या उत्कृष्ठ गोलंदाजीने २००७ टी-२० वर्ल्ड कप मिळवून देणारा जोगेंद्र शर्माला क्रिकेटमधून निवृत्तीनंतर हरियाणा पोलिसात डीएसपी म्हणून घेण्यात आले आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून हरियाणा पोलिसात डीएसपी पदाचा कार्यभार सांभाळत आहे.

७. यजुवेंद्र चहल - (इंस्पेक्टर, प्राप्तिकर विभाग)

सध्या आयकर खात्यात निरीक्षक म्हणून नियुक्त असलेला भारताचा स्टार लेग स्पिनर यजुवेंद्र चहलबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे कि तो आयकर विभागामध्ये इंस्पेक्टर पदावर कार्यरत आहे. चहलला २०१८ मध्ये हि नोकरी देण्यात आली होती. क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी चहल नॅशनल लेवल चेस चॅपियन देखील राहिला आहे.

८. उमेश यादव- (असिस्टंट मॅनेजर, आरबीआय)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवही आरबीआयमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आरबीआईने उमेशला २०१७ मध्ये नागपूर शाखेमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नियुक्त केले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने