सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध सिरीयल सीआईडी तर सर्वाना चांगलीच माहिती असेल. हि सिरीयल टीव्हीवर दीर्घकाळ चाललेली आणि सर्वात लोकप्रिय सिरीयलपैकी एक आहे. हि सिरीयल जवळ जवळ २१ वर्षांपासून दर्शकांचे मनोरंजन करत आहे.

आणि आज देखील या सिरीयलचा टीआरपी कमी झालेला नाही. एसीपी प्रद्युम् आणि इंस्पेक्टर दया या सिरीयलमधील दोन सर्वात प्रसिद्ध भूमिका होत्या आणि दर्शकांमध्ये या दोन भूमिका खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. शिवाजी साटमने एपी प्रद्युम्नची भूमिका साकारली होती तर दयानंद शेट्टीने दयाची भूमिका साकारली होती.

इन्स्पेक्टर दया तो आहे जो या सिरीयलमध्ये नेहमी दरवाजा तोडताना पाहायला मिळत होता आणि आपल्या उत्कृष्ठ शरीरयष्टी आणि चमकदार चेहऱ्याने सर्वांचे मन जिंकत होता. दयानंद शेट्टीने हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अजय देवगनच्या सिंघम चित्रपटामध्ये तो दिसला होता.

या लेखामध्ये आपण दया आणि त्याच्या पत्नी बद्दल जाणून घेणार आहोत जी दिसायला खूपच सुंदर आहे. तुम्ही तिच्याबद्दल खूप काही ऐकले असेल. दयानंद शेट्टीचा जन्म ११ डिसेंबर १९६९ रोजी उडुपी, कर्नाटकमध्ये झाला होता. तो एक भारतीय मॉडेल आहे.

दयानंद शेट्टीच्या पत्नीचे नाव स्मिता शेट्टी आहे. दया आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो. दया आणि स्मिता यांना एक मुलगी देखील आहे जिचे नाव चिरायु आहे. दयानंदची पत्नी एक गृहिणी असून तिला लाइमलाइटपासून दूर राहणेच जास्त आवडते. पण तुम्ही देखील तिच्या फिटनेस आणि सौंदर्याबद्दल तिची प्रशंसा कराल.

दयानंदने आपल्या करियरची सुरुवात एक टीव्ही अभिनेता आणि मॉडेल म्हणून केली होती. १९९८ मध्ये त्याने प्रसिद्ध टीव्ही सिरीयल CID मध्ये काम करायला सुरुवात केली. या सिरीयलमध्ये त्याला इंस्पेक्टर दयाची भूमिका मिळाली. दयानंदने हि हिट सिरीयल आणि गुटुर गू, सिंघम रिटर्न्स, सूर्या द सुपर कॉप, रनवे, जॉनी गद्दार, दिलजले सारख्या चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.

दयानंद आता ५० वर्षांचा झाला आहे आणि त्याच्या लग्नाला अनेक वर्षे लोटली आहेत. त्याने सिरियल्समध्ये काम करणे बंद केले आहे आणि आता तो चित्रपटांमध्ये काम करताना पाहायला मिळतो. दयानंद एक उत्कृष्ठ खेळाडू देखील होता पण त्याला पायाला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे खेळाला मुकावे लागले आणि त्याने अभिनय क्षेत्राला आपले करियर म्हणून निवडले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने