बॉलीवूडची मेलोडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा भोसले यांचा आज ८७ वा वाढदिवस आहे. आशा ताईचा जन्म १९३३ मध्ये महाराष्ट्राच्या सांगलीमध्ये झाला होता. आतापर्यंत त्यांनी १६ हजारपेक्षा जास्त गाण्यांना आपला आवाज दिला आहे. आशा ताईच्या प्रोफेशनल लाईफसोबत वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील अनेक उतार चढाव आले. चला तर जाणून घेऊया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल.

लता दिदींनी केला कुटुंबाचा सांभाळ

आशा भोसलेची मोठी बहिण लता मंगेशकर यांनी वयाच्या १४ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती. लता दिदींनी आपल्या भाऊ-बहिणींचा मुलांप्रमाणे सांभाळ केला. आपली जबाबदारी त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली. जेव्हा आशा मोठी झाली तेव्हा लता दीदीने याच जबाबदरी आणि गांभीर्याची त्यांच्याकडून अपेक्षा केली होती.

नियमांमध्ये अडकायला आवडत नाही

तथापि आशा ताई लहानपणापासूनच वेगळ्या स्वभावाच्या होत्या. त्यांना कोणत्याही प्रकारच्या नियमांमध्ये अडकणे पसंत नव्हते. त्यांनी आपला वेगळा मार्ग निवडला. १६ व्या वर्षीच त्यांनी गणपतराव भोंसलेसोबत लग्न केले. गणपतराव भोंसले तेव्हा ३१ वर्षांचे होते. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि गणपतराव भोंसले त्यावेळी लता मंगेशकर यांचे सेक्रेटरी होते.

दीदी झाल्या नाराज

एका मुलाखतीदरम्यान स्वतः आशा ताईंनी सांगितले होते कि लता दीदीने आशा आणि गणपतच्या नात्याला मंजुरी दिली नव्हती. यानंतर दोघांमध्ये खूपच दुरावा आला. दोघींमध्ये बराच काळ बोलणे बंद होते. आशा आणि गणपतराव यांना तीन मुले झाली, पण त्यांचे लग्न अत्यंत कडव्या वळणावर येऊन संपुष्टात आले, ज्यानंतर दोघे वेगळे झाले.

आरडी बर्मनसोबत दुसरे लग्न

यानंतर आशा ताईंनी संगीतकार आरडी बर्मनशी लग्न केले. बर्मन देखील आधीपासून विवाहित होते. पहिली पत्नी रिता पटेलसोबत त्यांचा घटस्फोट झाला होता. दोघांचे संगीत प्रेम त्यांना जवळ घेऊन आले. ६ वर्षांनी लहान बर्मनने आशा ताईला प्रपोज केले. या प्रपोजलच्या खूपच वेळानंतर आशा ताई त्यांच्या सोबत लग्नासाठी तयार झाल्या. १९८० मध्ये दोघांनी लग्न केले. तथापि या लग्नाच्या काही काळानंतर काही मतभेद झाले पण तरीही ते नात्यामध्ये राहिले. आरडी बर्मनचे अकाली निधन झाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने