बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका पेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. अभिनेत्रींच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. फिल्मी जगतामध्ये जास्तकरून चांगली हाईट असणाऱ्या अभिनेत्रींना प्राधान्य दिले जाते. यामागे कारण असते स्क्रीनवर उत्कृष्ठ दिसणे. पण कधी-कधी या अभिनेत्री अभिनेत्यांपेक्षा उंच दिसतात. अशामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने दोघांची उंची बरोबर करण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्यांची उंची हिरोंना देखील मात देते.

सुष्मिता सेन

बॉलीवूड फिल्मी जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड सुष्मिता सेन सध्या आपल्या लव्ह लाईफमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. बातमी आहे की ती लवकरच आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करू शकते सुष्मिता आता चित्रपटांपासून दूर असते. तिने गोविंदा पासून ते सलमान-आमिर पर्यंत अभिनेत्यांसोबत काम केले आहे. सुष्मिता सेनची हाईट ५ फूट ७ इंच आहे.

सोनम कपूर

बॉलीवूड फिल्मी जगतामधील झक्कास अभिनेता अनिल कपूरची मुलगी अभिनेत्री सोनम कपूरने बिझनेसमन आनंद आहूजाशी लग्न केले असून तिने आपला संसार थाटला आहे. सोनम नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे आणि फॅशनमुळे चर्चेत असते. सोनम कपूरची हाईट ५ फूट ७ इंच आहे आणि ती बॉलीवूडमधील सर्वात उंच अभिनेत्री आहे.

कॅटरीना कैफ

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री कॅटरीना कैफची देखील उंची चांगली आहे. या अभिनेत्रीच्या अभिनयाचे नेहमी कौतुक केले जाते. कॅटरीना कैफची हाईट ५ फूट ६ इंच आहे.

अनुष्का शर्मा

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. नुकतेच तिने आपल्या प्रेग्नंसीची अनांसमेंट केली आहे. तिने बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या रब ने बना दी जोड़ी चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. अनुष्काची हाईट ५ फूट ६ इंच आहे.

दीपिका पादुकोण

बॉलीवूड फिल्मी जगतामधील टॉप अभिनेत्रींपैकी दीपिका पादुकोण उंच अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पादुकोण छपाक चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. दीपिकाची हाईट ५ फूट ७ इंच आहे.

बिपासा बासु

चित्रपटांपासून दूर असलेली बॉलीवूड फिल्मी जगतामधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री बिपासा बासू तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. अभिनेत्री बिपाशा बासूची हाईट देखील ५ फूट ५ इंच आहे.

शिल्पा शेट्टी

बॉलीवूड फिल्मी जगतामधील सर्वात फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या लग्न आणि एका मुलाची आई बनल्यानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली आहे. बॉलीवूडमध्ये तिला नंबर वन यमी मम्मी म्हंटले जाते. शिल्पाची हाईट ५ फूट ६ इंच आहे.

प्रियांका चोप्रा

बॉलीवूडची देसी गर्ल आणि माजी मिस वर्ल्ड अभिनेत्री प्रियांका चोप्राची हाईट ५.५ फूटच्या आसपास आहे. इतकी उंच असून देखील प्रियांकाला हिल्स घालण्याची आवड आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने