दिव्या भारतीने खूपच लहान वयामध्ये बरेच यश आणि लोकप्रियता मिळवली होती. आज देखील असे अनेक लोक आहेत जे म्हणतात कि दिव्या भारती बॉलीवूडमधील सर्वात उत्कृष्ठ अभिनेत्री होती. दिव्या भारतीने जे स्थान निर्माण केले ते प्रत्येकजण करू शकत नाही. दिव्या भारतीने खूपच कमी वयामध्ये जगाचा निरोप घेतला होता. दिव्या भारतीचा मृत्यू अजून देखील एक रहस्यच आहे.

वयाच्या १४ व्या वर्षी सुरु केले करियर

दिव्या भारतीने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात वयाच्या १४ व्या वर्षी केली होती. तिने अवघ्या एका वर्षामध्येच अमाप लोकप्रियता मिळवली. दिव्या भारतीने आपल्या छोट्याशा करियरमध्ये १२ चित्रपटांमध्ये काम केले. दिव्या भारती खूपच कमी वयामध्ये खूपच सुंदर दिसत होती आणि खूप लोकप्रिय झाली होती. तिने दीवाना, बलवान, दिल आशना है, दिल ही तो है सारखे सुपरहिट चित्रपट दिले.

अशाप्रकारे झाली होती साजिदशी भेट

दिव्या भारती जेव्हा १६ वर्षांची होती तेव्हा तिची भेट साजिद नाडियाडवाला सोबत झाली होती. या दोघांची भेट फिल्म सिटीमध्ये शोला और शबनम चित्रपटाच्या शुटींग दरम्यान झाली होती. त्यावेळी साजिद गोविंदाला भेटण्यासाठी पोहोचला होता. गोविंदानेच साजिद आणि दिव्याची भेट घडवून आणली होती. यानंतर साजिदने १५ जानेवारी १९९२ रोजी दिव्या भारतीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवालाचे लग्न २० मे १९९२ रोजी झाले होते आणि दिव्या भारतीने इस्लाम धर्म स्वोकारून आपले नाव सना नाडियाडवाला ठेवले होते.

आपल्या मृत्यूच्या काही तास अगोदर खरेदी केले होते घर

दिव्या भारतीने आपल्या मृत्यूच्या काही तास अगोदर मुंबईमध्ये एक नवीन ४ बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. हि बातमी तिने आपला भाऊ कुणालला देखील दिली होती. त्याच दिवशी दिव्या भारती शुटींग करून चेन्नईवरुन आली होती. तिच्या पायाला दुखापत झाली होती. दिव्या भारती रात्री १०.०० वाजता मुंबईच्या पश्चिम अंधेरी, वर्सोवा येथे स्थित अपार्टमेंटमध्ये आपल्या घरामध्ये नीता लुल्ला आणि तिचा पती साजिद सोबत होती. तिघे खूप मस्ती करत होते. पण काही मिनिटांनंतर दिव्या अचानक आपल्या रूमच्या खिडकीमधून खाली पडली. दिव्या भारतीच्या खिडकीला ग्रील लावली नव्हती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने