हिंदू धर्मात, भगवान श्रीराम यांची पूजा व आराधना केली जाते. भगवान श्रीराम हे जेव्हा दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, जेव्हा सीतेसह अयोध्येला परतले, तेव्हा पासूनच दिवाळी हा सण साजरा होऊ लागला. भगवान श्रीराम यांना ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणून देखील ओळखले जाते. आपण  भगवान राम यांच्यावर खूप विश्वास व श्रद्धा ठेवतो परंतु भगवान श्रीराम यांचे छायाचित्र असलेल्या नोटे बद्दल किंवा त्या देशाबद्दल कदाचित तुम्हाला काही माहिती नसेल. आज आपण अशाच एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या देशाच्या चलनावर भगवान श्रीमाचा फोटो आहे.

आपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत त्या देशाचे नाव नेदरलँड् असे आहे. असे म्हटले जाते की भगवान श्रीराम यांचे छायाचित्र असलेल्या नोटा या देशाचे चलन आहे. होय, जसे भारतातील प्रत्येक नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे छायाचित्र आहे. त्याचप्रमाणे भगवान श्रीराम यांचे छायाचित्र इथल्या प्रत्येक नोटांवर पाहायला मिळते.

नेदरलँड्समध्ये राम मुद्रेला कायदेशीर मान्यता प्राप्त आहे. येथे श्रीरामाच्या फोटोसाठी आपल्याला १० युरो मिळतात. एका न्यूज वेबसाईटनुसार आणि डच सेंट्रल बँकेनुसार सध्या नेदरलँड्समध्ये जवळ जवळ एक लाख राम चलन प्रचलित आहेत. लोक या चलनासाठी बँकेत जाऊ शकतात आणि त्या बदल्यात १० युरो घेऊ शकतात.

२००२ मध्ये, महर्षि महेश योगी यांनी या देशात भगवान राम यांचे छायाचित्र असलेल्या नोटा जारी केल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत या नोटा त्या देशात चलनात आहेत. नेदरलँडमधील एका राम नाम नोटेचे भारतीय चलनात 800 रुपये इतके मूल्यांकन होते.

एका राम मुद्रेचे मूल्य १० अमेरिकन डॉलर्स निश्चित केले गेले आहे. या प्रकारच्या तीन नोटा येथे छापण्यात आल्या आहेत. ज्या नोटेवर एक राम त्याचे मूल्य १० डॉलर्स, ज्यावर दोन त्याची किंमत २० डॉलर्स आणि ज्यावर तीन राम छापले आहेत त्याचे मूल्य ३० डॉलर्स निश्चित करण्यात आले आहेत. आश्रमाच्या आतमध्ये सदस्य याचा वापर आपसात करतात. आश्रमाच्या बाहेर गेल्यास या राम मुद्रेला डॉलर्सच्या बरोबरीने मूल्य दिले जाते.

या देशात भगवान श्रीराम यांचे छायाचित्र असणारे चलन बाजारात आणणारे महर्षि महेश योगी यांचा जन्म मध्य प्रदेशातील जबलपुर येथे झाला होता. ते कायस्थ कुटुंबातील होते आणि त्यांनी शंकराचार्यांच्या आश्रमात सुमारे तेरा वर्षे अध्यात्म आणि धर्माचे ज्ञान दिले होते. योगी यांना भारतीय संस्कृती, अध्यात्मिक, जागतिक बंधुता आणि आधुनिकता आणि जगाचा महान समन्वयक म्हणून ओळखले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने