ज्योतिषमध्ये नऊ ग्रह सांगितले गेले आहेत आणि सर्व ग्रहांचा वेगवेगळा धातू असतो. नऊ ग्रहांचा राजा सूर्य आहे आणि तांबे सूर्याचा धातू आहे. हिंदू धर्मामध्ये सोने, चांदी आणि तांबे हे तीन धातू पवित्र मानले जातात. यामुळे पूजेमध्ये या धातूंचा समावेश केला जातो. याशिवाय या तीन धातूंची अंगठी देखील खूप लोक परिधान करतात. चला तर जाणून घेऊया तांब्याची अंगठी परिधान करण्याचे लाभ कोणकोणते आहेत.

तांब्याची अंगठी परिधान केल्याने आपल्या शरीरावर, आपल्या कार्यावर, आपल्या बिजनेसवर आणि आपल्या आर्थिक स्थितीवर व्यापक प्रभाव पडतो. जर तुमच्या कुंडली मध्ये सूर्यदोष आहे आणि तुमची इच्छा आहे कि तुमच्यावरील सूर्यदोषाचा प्रभाव कमी व्हावा तर तांब्याची अंगठी आपल्या अनामिकामध्ये परिधान करावी. यामुळे तुमच्या कुंडलीमधील सूर्यदोष कमी होतो.

सूर्यासोबतच तांब्याची अंगठी परिधान केल्याने मंगळाचा प्रभाव देखील कमी होतो. जर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्राचा प्रभाव देखील आहे तर तांब्याची अंगठी परिधान केल्यानंतर शुक्राचा वाईट प्रभाव देखील कमी होतो.

तांब्याच्या अंगठीच्या प्रभावाने सूर्याचे बळ वाढते ज्यामुळे आपल्याला सूर्यदेवाच्या कृपेने कुटुंब आणि समाजामध्ये मानसन्मान मिळतो.

जर तुम्हाला वाटत असेल कि तुम्हाला समाजामध्ये हीन दृष्टीने पाहिले जाते आणि तुम्हाला वाटते कि आपल्याला कुठेना कुठे हानी झाली आहे तर तांब्याची अंगठी धारण केल्याने तुमचा मानसन्मान आणि तुमचा आदर समाजामध्ये वाढेल. तांब्याची अंगठी सतत आपल्या शरीराच्या संपर्कामध्ये राहते आणि याच्या स्पर्शाने याचे गुण शरीराला मिळत राहतात.

तांब्याची अंगठी परिधान करण्याने आपल्या शरीरातील रक्त देखील शुद्ध होते आणि रक्तातील उष्णता देखील तांबे कमी करते. ज्याप्रकारे तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी आरोग्यासाठी लाभदायक असते त्याचप्रकारे तांब्याची अंगठी परिधान केल्याने देखील आपल्याला फायदा मिळतो. तांब्याची अंगठी परिधान केल्याने पोटासंबंधी आजारांमध्ये देखील लाभ मिळतो. तांब्याची अंगठी त्वचेच्या संपर्कामध्ये राहते आणि यामुळे त्वचेमध्ये चमक देखील वाढते.

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्याचा वापर केल्याने आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते. हेच फायदे आपल्या तांब्याची अंगठी परिधान केल्याने देखील मिळतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने