अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने नुकतेच आपल्या मुलाच्या येण्याची बातमी सोशल मिडियाद्वारे जगाला दिली आहे. असा अंदाज आहे कि अनुष्काल शर्माचे बाळ तिच्यासाठी खूपच लकी सिद्ध होऊ शकते. अनुष्काचे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकले नाहीत. पण प्रेग्नंसीच्या न्यूज नंतर अनुष्काच्या हाती एक जबरदस्तब ऑफर लागली आहे. दिग्दर्शक ओम राऊत आपल्या आगामी बिग बजट आदिपुरुष चित्रपटामधील सीतेच्या शोधात आहे. या चित्रपटामध्ये प्रभास मुख्य भुमिकेमध्ये आहे आणि अशी बातमी समोर आली आहे कि सिता बनण्याच्या रेसमध्ये अनुष्का शर्मा सर्वात पुढे आहे.

एका न्यूज वेबसाईटच्या बातमीनुसार आदिपुरुषच्या मेकर्सची सितासाठी सर्वात पहिली पसंती अनुष्का शर्मा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेल्या वृत्तानुसार असे सांगितले जात आहे कि दिग्दर्शक ओम राउतने या भुमिकेसाठी अनुष्का शर्माची भेट घेतली आहे आणि अनुष्काला देखील हि भूमिका खूप आवडली आहे. अनुष्का देखील या प्रोजेक्टबद्दल खूपच उत्सुक आहे आणि जर सर्व काही ठीक राहिले तर अनुष्का शर्मा मोठ्या पडद्यावर आपल्या सीतेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळू शकते.


नुकतेच अनुष्का शर्माने आपल्या प्रेग्नंसीची अनाउंसमेंट केली आहे आणि ती आपल्या बेबी बंपसोबत दिसली होती. तिची डिलीवरी डेट पुढच्या वर्षीच्या जानेवारीमधील आहे. तर दिग्दर्शक ओम राऊतचा हा चित्रपट देखील जानेवारीपासूनच ऑन-फ्लोर होत आहे. रिपोर्टनुसार अनुष्का आपल्या प्रेग्नंसीच्या दोन महिन्यानंतर शुटींगसाठी तयार होईल. कारण हा चित्रपट रामायण वर आधारित आहे, यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये चित्रपटाचा मोठा भाग राम म्हणजेच प्रभाससोबत शूट होणार आहे.

टी-सीरीजच्या या प्रोजेक्टमध्ये लंकेशच्या भूमिकेमध्ये सैफ अली खानची निवड आधीच झाली आहे. अशामध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये सैफ आणि प्रभासचे सीन शूट केले जातील. माहितीनुसार अनुष्का शर्मा या भूमिकेसाठी दिग्दर्शक ओम राऊतची पहिली पसंत आहे, पण अजूनदेखील अनुष्का हा चित्रपट साईन करण्यास वेळ आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने