जर घरामध्ये मुंग्या निघत असतील तर हे आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या काही घटनांबद्दल संकेत आहेत. घरामध्ये मुंग्या निघणे आपण एक सामान्य बाब समजून त्यावर दुर्लक्ष करतो पण हे खूप मोठ्या घटनांबद्दल संकेत देतात. मुंग्या घरामध्ये वरच्या दिशेला जात आहेत कि खालच्या दिशेला जात आहेत. याशिवाय घरामध्ये आलेल्या मुंग्याना काही खायला मिळत आहेत का नाही हे देखील होणाऱ्या घटनेंवर केंद्रित मानले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्या येत आहेत तर हे सुख आणि ऐश्वर्याचा काळ येण्याचा संकेत आहे. काळ्या मुंग्या सामन्यत: घरामध्ये पाहायला मिळतात. अनेक लोक काळ्या मुंग्यांना साखर, पीठ सारखे खाद्य पदार्थ देतात. शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे कि काळ्या मुंग्यांना भोजन देणे शुभ असते. जर भाताच्या भांडयामधून मुंग्या निघत असतील तर हा शुभ संकेत आहे. असे मानले जाते कि काही दिवसांमध्ये तुमची धन वृद्धी होणार आहे. व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. काळ्या मुंग्या येण्याने भौतिक सुखदायक गोष्टींसाठी शुभ मानले जाते.

लाल मुंग्या घरामध्ये दिसत असतील तर व्हा सावधान

जर तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या दिसत असतील तर सावधान व्हा. लाल मुंग्या अशुभ संकेत मानल्या जातात. धार्मिक मान्यतानुसार भविष्यामधील समस्या, विवाद, धन खर्च होण्याचे संकेत देखील मुंग्या देतात. जर लाल मुंग्या आपल्या घरामध्ये येत आहेत तर सर्व अशुभ कामे आपल्यासोबत होऊ शकतात. पण लाल मुंग्या तोंडामध्ये अंडे घेऊन जात असतील तर याला चांगले संकेत म्हणून पाहिले जाते. मुंग्यांना खाण्यासाठी खाद्य पदार्थ टाकले पाहिजेत. जर मुंग्या घरामध्ये उपाशी राहिल्या तर हे देखील अशुभ संकेत मानले जातात.

या दिशेने येण्याऱ्या मुंग्या शुभ असतात

निश्चित दिशेमधून आपल्या घरी मुंग्या येतात तर आपल्यासाठी हा शुभ संकेत होऊ शकतो. याशिवाय दक्षिण दिशेकडून येत असतील तर हे देखील फायदेशीर ठरेल. पूर्व दिशेने मुंग्या येत असतील तर नकारात्मक सूचना आपल्या घरामध्ये येऊ शकते. पश्चिम दिशेने मुंग्या येत असतील तर तुमचे बाहेरच्या प्रवासाचे योग बनू शकतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने