सुशांत सिंह राजपूत नेहमी डायरी लिहित असायचा. आपल्या स्वप्नांची लिस्ट बनवत होता. काही स्वप्ने त्याने पूर्ण केली तर काही स्वप्ने अपूर्ण राहिले. आता सुशांतच्या स्वप्नांना त्याचे कुटुंब, त्याचे मित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची एक्स राहिलेली अंकिता लोखंडेदेखील सुशांतची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक सुशांतचे एक स्वप्न होते कि त्याला १००० झाडे लावायची होती.

सुशांतच्या बहिणीने केला मॅसेज

सुशांत सिंह राजपूतच्या झाडे लावण्याच्या इच्छेबद्दल त्याची बहिण श्वेता सिंह कीर्तीने सांगितले. तिने सोशल मिडियावर चाहत्यांना झाडे लावण्याची अपील केली आहे. जेणेकरून सुशांतचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. सुशांतचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंकिता लोखंडे नुकतेच झाडे खरेदी करण्यासाठी पोहोचली. अंकिताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे ज्यामध्ये ती आपल्या आईसोबत झाडे खरेदी करताना पाहायला मिळत आहे.

अंकिताचा मॅसेज

अंकिता लोखंडे इथे सांगताना पाहायला मिळाली कि, सर्वाना मॅसेज द्या, झाडे लावा. सुशांतच्या ५० स्वप्नांपैकी एक स्वप्न हे होते कि त्याला १००० झाडे लावायची होती आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या घरापासून सुरुवात केली आहे आणि मला अशा आहे कि सर्वजण झाडे लावतील.

गेल्या काही दिवसांमध्ये अंकिताने टीव्हीवर पवित्र रिश्ता सिरीयल सुरु होण्याची माहिती दिली होती. हि सिरीयल त्यांच्यासाठी खूपच खास आहे, कारण या शोमध्ये दोघांनी एकत्र काम केले होते आणि या शोमधून दोघांना प्रसिद्धी मिळाली होती. अंकिताने शोचा प्रोमो शेयर करताना लिहिले कि, पुन्हा एकदा. पवित्र रिश्ता दररोज दुपारी ३ वाजता संध्याकाळी ६ वाजेपर्यंत टीव्हीवर दाखवले जाणार आहे.

आईसाठी इमोशनल पोस्ट

अंकिता लोखंडे सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावरुन एकदम गायब झाली होती. पण ती आता अॅक्टिव्ह झाली आहे. अंकिताने आईसोबत आपले क्युट फोटो शेयर केले आहेत. फोटोज शेयर करताना तिने लिहिले आहे, माझी सर्वात पहिली आणि माझी कायमची फेवरेट टीचर. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. मला माझ्या मुलांसाठी तुमच्यासारखे बनायचे आहे. लव यू आई. अंकिताने हि पोस्ट शिक्षक दिनानिमित्त आपल्या आईसाठी केली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने