बॉलीवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी बिजनेस फॅमिलीमधील आपल्या जोडीदाराची निवड केली आणि नंतर सर्व काही सोडून कुटुंबामध्ये रमल्या. या नावांमध्ये टीना मुनीमचे नाव देखील सामील आहे. देशातील सर्वात श्रीमंत घराण्यातील सून बनलेली टीना मुनीमचे करियर त्यावेळी शिखरावर होते. ती खूपच सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक होती. टीना मुनीमपासून टीना अंबानी बनण्याचा प्रवास खूपच रंजक होता. कशी बनली टीना अनिल अंबानी यांची पत्नी पुढे वाचा.

१९७५ मध्ये सुरु केले करियर

११ फेब्रुवारी १९५७ रोजी टीनाचा जन्म मुंबईमध्ये झाला. १९७५ मध्ये तिने फेमिना टीन प्रिंसेसचा क्राउन जिंकला आणि येथूनच तिच्या ग्लॅमर वर्ल्डमधील करिअरची सुरुवात झाली. टीना मुनीमला चित्रपटांमध्ये आणण्याचे श्रेय देव आनंद यांना जाते. टीनाचा पहिला चित्रपट देव आनंदसोबत १९७८ मध्ये देस-परदेस होता. यानंतर ती देव साहेबसोबत १९८० मध्ये लुटमार आणि मन पसंद चित्रपटामध्ये देखील दिसली होती. टीना मुनीमने इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत काम केले. तथापि लग्नानंतर ती चित्रपटांमध्ये दिसली नाही.

१९८६ मध्ये झाली होती अनिल अंबानीसोबत भेट

१९८६ मध्ये अनिल अंबानीची टीना मुनीमसोबत पहिली भेट टीनाचा भाचा करणमुळे झाली होती. पहिल्या भेटीमध्येच अनिलला टीना खूपच आवडली. टीनाला देखील अनिल आवडला. पण अनिलची फॅमिली या लग्नाच्या विरुध्द होती. टीनाचे चित्रपटांमध्ये काम करणे याचे कारण होते. पण दोघांचे प्रयत्न यशस्वी झाले. फॅमिलीच्या संमतीनंतर टीनाने १९९१ मध्ये अनिल अंबानीसोबत लग्न केले.

लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम नाही केले

अनिल अंबानीसोबत लग्न केल्यानंतर टीना मुनीमने कोणत्याही चित्रपटामध्ये काम केले नाही. रॉकी, देस परदेस, मन पसंद, बातों बातों में, सौतन, बड़े दिलवाला, इजाजत हे काही टीनाचे उत्कृष्ठ चित्रपट राहिले आहेत. टीना अंबानीची जोडी संजय दत्त, राजेश खन्ना, रिषी कपूर सारख्या अभिनेत्यांसोबत खूपच पसंत केली गेली. तथापि टीना अंबानी घराण्याची लहान सून बनली आणि त्यानंतर तिने कधी चित्रपटांमध्ये काम केले नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने