बॉलीवूडमध्ये अफेयरच्या बातम्या सामान्य समजल्या जातात, पण जुन्या काळामधील काही अशा स्टोरीज समोर येतात ज्या जाणून घेतल्या नंतर त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. एके काळी अक्षय कुमारचे हृदय शिल्पा शेट्टीसाठी धडकत होते, तर अभिनेत्री देखील त्याच्यासाठी वेडी होती. आज आपण त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत.

अक्षय-शिल्पाची लव्ह स्टोरी

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या लव्ह स्टोरीची सुरुवात मै खिलाडी तू अनाड़ी चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सुरु झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. इथून त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. दोघांनी एकत्र काही इतर चित्रपट देखील केले ज्यामध्ये इंसाफ, जानवर आणि धडकन हे चित्रपट सामील आहेत.

सर्वत्र लव्हस्टोरीची चर्चा

शिल्पा आणि अक्षय कुमारच्या लव्हस्टोरीची चर्चा सामान्य झाली होती. जिथे पाहाल तिथे फक्त या दोघांच्या अफेयरच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. एकदा तर अशी वेळी आली कि दोघे लग्नासाठी देखील तयार झाले होते. एकमेकांच्यावर प्रेम करत होते, एकमेकांच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार होते. त्यादरम्यान अक्षयच्या आयुष्यामध्ये ट्विंकल खन्नाची एंट्री झाली, शिल्पा हि गोष्ट सहन करू शकली नाही.

उघडपणे बोलली होती शिल्पा

२००० मध्ये शिल्पाने एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमारविरुध्द उघडपणे भडास काढली होती. त्या मुलाखतीमध्ये शिल्पाने म्हंटले होते कि अक्षयने मला धोका दिला आहे. ती त्या मुलाखतीमध्ये इतकी रागामध्ये होती कि हे स्पष्टपणे दिसत होते कि ती आतून किती खचली होती. शिल्पाने शपथ घेतली होती कि येथून पुढे ती कधीच अक्षय कुमार सोबत काम करणार नाही. मला ट्विंकलशी कोणतीही तक्रार नाही, पण मी अक्षयला कधीच माफ करणार नाही, त्याने मला धोका दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने