भारतीय चित्रपट जगतामध्ये सर्वोत्कृष्ट आणि सुंदर अभिनेत्रींची कमतरता नाही. नूतन बॉलीवूडमधील सर्वात सदाबहार अभिनेत्रींपैकी एक आहे. ब्लॅक अॅीन्ड व्हाईट चित्रपटांपासून ते कलर चित्रपटांपर्यंत नूतनला तिच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी आज देखील आठवले जाते. आज आपण तिच्याबदल एक रंजक किस्सा जाणून घेणार आहोत. खूपच कमी वयामध्ये बॉलीवूडमध्ये आपल्या करियरची सुरुवात केलेल्या नूतनला आपलाच चित्रपट पाहण्यासाठी रोखण्यात आले होते.

हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्रींपैकी एक असलेल्या नूतनचा जन्म २४ जून १९३६ रोजी झाला होता. नूतन आपल्या काळामधील प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ आणि निर्देशक कुमारसेन समर्थच्या चार मुलांमध्ये सर्वात मोठी होती, जिने बॅडमिंटन, घोडेस्वारी, पोहणे तसेच संगीताचे प्रशिक्षण देखील घेतले होते. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी नूतनने ताज महल हॉटेलमध्ये एक परफॉर्मन्स दिला होता. ९ व्या वर्षी नूतनने आपल्या वडिलांच्या नल दमयंती चित्रपटामध्ये एक बालकलाकार म्हणून काम केले होते. नूतनने वयाच्या १४ व्या वर्षी १९५० मध्ये हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन नूतनची आई शोभना समर्थने स्वत: केले होते, ज्याचे नाव हमारी बेटी होते.

नुतच आपल्या जन्मापासूनच इतकी बारीक होती कि तिची आई तिला अगली बेबी आणि अगली डक सारख्या नावाने बोलवत असायची. पण कोणाला माहित होते कि १९५२ मधील कुरूप मुलगी मिस इंडियाचा किताब जिंकून सर्वांनाच चकित करेल. असे पहिल्यांदाच झाले होते कि जेव्हा एखाद्या अभिनेत्रीने आपले बॉलीवूड करियर सुरु झाल्यानंतर दोन वर्षानंतर मिस इंडिया बनली होती.

नूतन जेव्हा नवीन नवीन मिस इंडिया बनली होती तेव्हा निर्माता पंचोली प्रोडक्शनचा नगीना चित्रपट प्रदर्शित होणार होता आणि हे पहिल्यांदाच होते कि पंचोली प्रोडक्शनद्वारे मोठ्या पोस्टरसोबत या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले होते कि चित्रपटाच्या अभिनेत्रीची मिस इंडिया म्हणून निवड करण्यात आली आहे. हे जाणून हैराणी होईल कि नूतनला आपल्या नगीना चित्रपट पाहण्यासाठी थियेटरमध्ये एंट्री दिली गेली नव्हती.

याचे मुख्य कारण हे होते कि ती फक्त १४ वर्षांची होती. चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान तिला वॉचमनने आतमध्ये जाण्यास रोखले होते. नूतनने वॉचमनला खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण वॉचमनने तिला आतमध्ये जाऊ दिले नाही. त्यानंतर ती चित्रपट न पाहताच परत घरी निघून आली. नूतनचा चित्रपट प्रौढांसाठी होता ज्याला सेन्सॉर बोर्डाने ए प्रमाणपत्र दिले होते.

नूतनच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी आली होती कि तिला अभिनेत्री बनण्यासाठी कोर्टामध्ये जावे लागले होते. कोर्टामध्ये तिने आपली आई शोभनाविरुद्ध दावा केला होता ज्यामध्ये तिने आपल्या आईवर कमाईमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. पण काही काळानंतर दोघांचे नाते पुन्हा सामान्य झाले. नूतनने अशोक कुमार सोबत बंदिनी आणि राज कपूरसोबत कन्हैया, छलिया आणि अनाड़ी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तिने देव आनंदसोबत पेइंग गेस्ट, बारिश, मंज़िल आणि तेरे घर के सामने सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. दिलीप कुमारसोबत तिचे नाव दोन वेळा जोडले गेले होते पण १९८६ चा चित्रपट कर्मामध्ये एकत्र पाहिले गेले होते.

भारतीय चित्रपटांमधील सर्वात प्रतिभाशाली आणि अनोखी अभिनेत्री नूतनला सहा वेळा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार देण्यात आला होता. फक्त तिची भाची आणि बहिणीची मुलगी काजोलने आतापर्यंत बॉलीवूडमध्ये नूतनच्या रेकॉर्डची बराबरी केली आहे.

नूतनच्या फिल्मी करियरची सुरुवात १९५९ मध्ये झाली होती, जेव्हा तिने कमांडर रजनीश बहलसोबत लग्न केले आणि एक मुलगा मोहनीश बहलला जन्म दिला. पण १९८९ मध्ये नूतनचे अचानक कॅ-न्स-रसारख्या गंभीर आजाराने निधन झाले. बॉलीवूडच्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचे निधन ५५ व्या वर्षी २१ फेब्रुवारी १९९१ मध्ये झाले. तथापि नूतन आज जगामध्ये नाही पण यामध्ये काहीच शंका नाही कि तिचा उत्कृष्ठ अभिनय लोकांसाठी एक उत्कृष्ठ उदाहरण बनले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने