बॉलीवूड कलाकारांचे अनेक किस्से नेहमी चर्चेमध्ये राहत असतात. ज्याबद्दल लोक नेहमी उत्सुक असतात. या बॉलीवूड कलाकारांच्या किस्स्यांमध्ये खास गोष्ट हि असते कि यामधून काहीतरी शिकायला मिळते, तर काही प्रमाणात प्रेरणा देखील मिळते. आजच्या या लेखामध्ये आम्ही अशाच एका खास किस्स्याबाद्द्ल सांगणार आहोत. हा किस्सा अजय देवन आणि त्याचा खूपच चांगला मित्र अभिषेक बच्चन संबंधित आहे. अजय आणि अभिषेक खूप चांगले मित्र आहेत. असे म्हंटले जाते कि यांच्या दोस्तीच्या सुरुवातीला एक अशी वेळ देखील आली होती जेव्हा अभिषेकला अजयमुळे रस्त्यावर रात्र घालवावी लागली होती.

झाले असे होते कि मेजर साहाब चित्रपटाची शुटींग सुरु होती. अभिषेकने त्यादरम्यान पहिल्यांदा प्रॉडक्शन बॉय म्हणून काम करण्यास सुरवात केली होती. त्याला प्रॉडक्शन बद्दल काही खास माहिती नव्हती. त्यावेळी अभिषेकला जबाबदारी देण्यात आली होती कि तो अजयला एयरपोर्टवरून पिक करून घेऊन येईल आणि हॉटेल मध्ये सोडेल. तथापि त्यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. पण यासाठी त्याला फुटपाथवर संपूर्ण रात्र काढावी लागली होती.

यादों की बारातच्या एका शोमध्ये अभिषेकने हा किस्सा शेयर करताना सांगितले होते कि चित्रपटाच्या एका गाण्याची शुटींग ऑस्ट्रेलियामध्ये होणार होती. त्यादरम्यान त्याला अजयला एयरपोर्टवरून पिक करून हॉटेलमध्ये सोडायचे होते. यानंतर काही वेळातच अजय युनिटसोबत तिथे येणार होता. पण त्यावेळी अभिषेकला प्रॉडक्शनविषयी काही खास माहिती नव्हती. पण यादरम्यान अजयला रिसीव करण्यासाठी तो एयरपोर्टला पोहोचला पण शेवटी त्याला समजले कि त्याने अजयसाठी कार मागवली नव्हती.

यानंतर त्याने कसे बसे करून टॅक्सीने अजयला हॉटेलपर्यंत पोहोचवले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याला आठवले कि अजयसाठी रूम देखील बुक केलेली नाही आणि त्याच्याजवळ पैसे देखील नव्हते. यानंतर अभिषेकने आपल्या रूममधून सामान हटवले आणि आपली रूम अजयला दिली आणि स्वतः कसे बसे रस्त्यावर रात्र घालवली, कारण त्याला अजयला हे सांगण्याची लाज वाट होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने