बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये तपास करत असेलेल्या पटना पोलिसांना आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण पुरावे हाती लागले आहेत ज्याच्या आधारावर मोठा खुलासा होऊ शकतो. आतापर्यंत नोंदवलेल्या जबाबांच्या आधारावर एसआईटीला याची माहिती झाली आहे कि ९ जून ते १३ जून दरम्यान सुशांतच्या मोबाईलमध्ये १४ सीम बदलले गेले होते हे काम कोणी केले होते हे शोधण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार असल्याचे बिहार पोलिसांनी सांगितले आहे.

पोस्ट-मार्टमवर देखील प्रश्न

तपासादरम्यान दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आता सुशांत सिंहच्या पोस्ट-मार्टमवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीबीआई चौकशीची मागणी करणाऱ्या अनेक लोकांचे हे म्हणणे आहे कि नियमित पोस्टमार्टम सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच केला जातो. विशेष परिस्थितीत दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरच रात्री पोस्टमार्टम केला जातो. पण बांद्रा पोलिसांनी याची पर्वा न करता रात्री एक वाजण्याच्या दरम्यान सुशांतच्या मृत-देहाचे पोस्ट-मार्टम केले.

कोटक महिंद्रा बँकेच्या खात्याच्या डिटेलमधून अनेक खुलासे

रिया नेहमी सुशांतच्या घरामध्ये पूजा-पाठ करत होती. एक महिन्यामध्ये तीन ते चार वेळा पूजा-पाठ होत होती. यासाठी सामान खरेदी करण्यासाठी सुशांतच्या अकाऊंट मधून खर्च होत होता. २०१९ च्या १४ जुलै ते १५ ऑगस्ट पर्यंत तीन वेळा सुशांतच्या खात्यामधून पंडितांना देण्यासाठी पैसे काढले गेले होते. सुशांतच्या वडिलांनी आपल्या केसमध्ये याचा उल्लेख केला होता कि रिया त्याच्या घरामध्ये पूजा-पाठ करत होती.

समोर येत आहेत पुरावे

सुशांत प्रकरणामध्ये हळू हळू पुरावे समोर येत आहेत. बँक खात्याच्या स्टेटमेंटने बरेच काही खुलासे केले आहेत. पटना पोलिसांच्या तपासामध्ये या सर्व गोष्टी आणि पुरावे खूपच महत्वाचे आहेत. कायद्याचे जाणकार सांगत आहेत कि, याची पुढच्या कारवाईसाठी खूपच मदत होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने