सुशांत सिंह राजपूतचे १४ जून रोजी निधन झाले. पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूला आ त्म ह त्या असल्याचे सांगितले आहे. यानंतर त्याच्या मृत्यूचा तपास सुरु आहे आणि आता महाराष्ट्र पोलिसांनंतर बिहार पोलीस देखील सुशांत मृत्यू प्रकरणामध्ये चौकशी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिहार पोलीस देखील सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये खूप सक्रीय झाले आहेत. या प्रकरणाची सर्व जबाबदारी आता एसपी विनय तिवारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

सुशांतच्या वडिलांनी केली आहे केस

सुशांतचे वडील केके सिंह यांनी २५ जुलैला एफआयआर दाखल केली होती आणि यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावले गेले. सुशांतच्या कुटुंबाचा आरोप आहे कि रियाने सुशांतला आ त्म ह त्येसाठी प्रवृत्त केले, त्याला जबरदस्ती बंद करून ठेवले आणि बँक खात्यामधून १५ करोड रुपये काढून घेतले. त्याचबरोबर सुशांतबद्दल त्याच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती दिली नाही.

तिवारी म्हणाले – बिहार पोलीस चांगले काम करत आहेत

या प्रकरणाच्या चौकशीसाठी विनय तिवारीच्या नेतृत्वामध्ये एक टीम मुंबईला पोहोचली आहे आणि मुंबईमध्ये विनय तिवारी यांनी सांगितले कि बिहार पोलीस मुंबईमध्ये चांगले काम करत आहे. गेल्या एक आठवड्याभरापासून जबाब नोंदवले जात आहेत. जबाबाच्या विश्लेषणानंतरच निकालावर पोहोचू आणि टीमचा तपास योग्य दिशेने चालू आहे. तथापि अजून सुशांतचा पोस्ट-मॉर्टम रिपोर्ट नाही मिळाला.

विनय तिवारी कोण आहेत?

विनय तिवारी मूळ रुपाने उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. त्यांचा जन्म ललितपुरचा आहे. तिवारी २०१५ बॅचचे आईपीएस ऑफिसर आहेत. आपल्या शिक्षा-दीक्षा बद्दल त्यांचे खूपच कौतुक होते. तिवारी एका शेतकरी कुटुंबातील आहेत. ललितपुरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कोटाला गेले. तिथे त्यांनी इंजीनियरिंगची तयारी केली नंतर आईआईटी-बीएचयू मधून सिविल इंजीनियरिंगची डिग्री घेतली. इंजीनियरिंगचे शिक्षण घेताना त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली. आईआईटी मधून पासआउट झाल्यानंतर ते दिल्ली शिफ्ट झाले. इथे राहून त्यांनी सिविल सर्विसेसची तयारी केली.

दुसऱ्या प्रयत्नात बनले आयपीएस अधिकारी

विनय तिवारी यांनी आपल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये सिविल सर्विसेसची परीक्षा पास केली आणि त्यांनी पोलीस सेवेची निवड केली. ट्रेनिंगनंतर २०१९ मध्ये ते पटनाचे एसपी बनले. तिवारी यांना साहित्यमध्ये देखील रुची आहे आणि ते नेहमी कविता पोस्ट करत असतात. गेल्या दिवसांमध्ये त्यांनी कोरोना व्हायरसवर एक कविता शेयर केली होती जी खूपच व्हायरल झाली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने