महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवरील पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. महेंद्रसिंग धोनीने इंस्टाग्रामवर लिहिले कि, तुम्हा लोकांचे प्रेम आणि सहकार्याबद्दल धन्यवाद, संध्याकाळी ७.२९ वाजता मला रिटायर समजा. त्याने आपल्या या पोस्टमध्ये आपल्या करियरमधील खास फोटो शेयर केले आहेत आणि मैं पल दो पल का शायर हूं हे गाणे खूपच सुंदर अंदाजामध्ये दाखवले आहे. एम एस धोनीच्या बायोपिकमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका साकारली होती.

महेंद्र सिंह धोनीला क्रिकेट प्रेमी प्रेमाने माही म्हणून बोलावतात. त्याला याबद्दल देखील ओळखले जाते कि यशाच्या शिखरावर पोहोचून देखील त्याने कधी आपला संयम गमवला नाही आणि तो नेहमी शांत राहिला. पडद्यावर धोनी बनण्यासाठी सुशांत सिंह राजपूतने माजी क्रिकेटर किरण मोरे यांच्याकडून एक वर्षापर्यंत ट्रेनिंग घेतली होती. किरणने त्याला शिकवले कि एक विकेट कीपर कसा विचार करतो आणि त्याची मूवमेंट कशी असते.

कसे तो स्वतःला फिट ठेवतो आणि कसे गोलंदाजाशी समन्वय साधतो. एखाद्या क्रिकेटर प्रमाणे त्यांनी सुशांतला ट्रेनिंग दिली होती. एक व्हिडिओ अॅनालिस्टने त्याला धोनीच्या प्रत्येक शॉटबद्दल बारकाईने समजावले होते जेणेकरून एखादा चेंडू कसा खेळायचा आहे हे सुशांतला समजू शकेल.

पुढे जाऊन मोठे शॉट कसे खेळायचे आहेत आणि बॅट कशी पकडायची, हे सर्व व्हिडिओ अॅनालिस्टच्या मदतीने सुशांतने या भुमिकेसाठी शिकून घेतले होते. सुशांतला धोनीचा प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉट सहा फ्रेममध्ये दाखवला गेला होता. नंतर बॉलिंग मशीनच्या मदतीने सुशांतला चेंडू टाकण्यात आले. सुशांतने एका दिवसामध्ये तीनशेपेक्षा जास्तवेळा हेलिकॉप्टर शॉटची प्रॅक्टिस केली होती जेणेकरून स्क्रीन वर त्याचा शॉट बनावट दिसू नये.

धोनी बनण्याच्या एक वर्षांच्या ट्रेनिंग दरम्यान सुशांत धोनीला तीनवेळा भेटला होता. पहिल्या भेटीमध्ये सुशांतने धोनीकडून त्याच्या सफलतेविषयी ऐकले. दुसऱ्या भेटीमध्ये सुशांतच्या जवळ धोनीला विचारण्यासाठी अनेक प्रश्न होते. जेव्हा धोनीने सुशांतला म्हंटले कि तू प्रश्न खूप विचारतोस तेव्हा सुशांतचे उत्तर होते कि, चाहते तुम्हाला माझ्यामध्ये शोधणार आहेत यामुळे मला तुम्हाला समजायला हवे.

क्रिकेटच्या जगतामध्ये धोनीला फिटनेसबद्दल देखील ओळखले जाते यामुळे सुशांतला अशा क्रिकेटरची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. पहिल्या चरणामध्ये त्याच्या शारीरिक क्षमतेचे परीक्षण करण्यात आले. या चरणामध्ये बॉक्सिंग, अडथळ्याची रनिंग, ट्रॅकिंग अशा वीस शारीरिक क्रिया कराव्या लागल्या. दुसऱ्या चरणामध्ये सुशांतला बॅलेट डांसिंगची ट्रेनिंग घ्यावी लागली, तिसऱ्या चरणामध्ये सुशांतला जिममध्ये मशीनच्या सहाय्याने घाम गाळावा लागला. याशिवाय सायकलिंग आणि फुटबॉलही खेळावे लागले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने