ब्राझीलमध्ये एक असा कुत्रा आहे, जो एका कार कंपनीचा कर्मचारी आहे. हे वाचायला आणि ऐकायला खूपच वेगळे वाटेल, कारण कुत्रा सिक्यूरिटी कंपनीच्या सिक्यूरिटी टीमचा हिस्सा असत नाही आणि कोणत्या कॅम्पेनचा तो भाग असत नाही, तर हा कुत्रा या कंपनीमध्ये एक सेल्समन म्हणून तैनात आहे. हि स्टोरी ब्राझील मधील हुंडाई कार कंपनीच्या शोरूममधील आहे. जिथे कंपनीने एका स्ट्रीट डॉगला दत्तक घेऊन आपल्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्याचा दर्जा दिला आहे. हा कुत्रा आणि याची स्टोरी सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाली आहे आणि चर्चेचा विषय बनली आहे.

रिपोर्ट्सनुसार ब्राझीलच्या एस्पिरिटो सांटो राज्यामध्ये हुंडाईचे एक शोरूम आहे. इथे शोरूममध्ये जेव्हा कोणताही ग्राहक येतो तेव्हा त्याची पहिली भेट हि टकसोन प्राइम नावाच्या कुत्र्याशी होते. हा कुत्रा या शोरूममधील एक कर्मचारी आहे आणि एक सेल्समन म्हणून येथे काम करतो. त्याला एक विशेष आईडी कार्ड देखील दिले गेले आहे.

शोरूममधील कर्मचाऱ्यांसोबत झाली दोस्ती

खरेतर हा कुत्रा नेहमी शोरूमच्या बाहेर फिरत असायचा आणि हळू हळू शोरूमच्या कर्मचाऱ्यांसोबत त्याची दोस्ती झाली. लवकरच शोरूममधील कर्मचाऱ्यांनी त्याला आपल्यासोबत सामील केले आणि कंपनीमध्ये एक मानद कर्मचारी म्हणून त्याला तैनात केले. कंपनीने यावर्षी मेमध्ये त्याला आपल्या ताफ्यामध्ये सामील केले आहे.

नुकतेच कंपनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून या कुत्र्याची स्टोरी शेयर केली आहे, ज्यामध्ये शोरूमच्या आतमध्ये गाड्यांसोबत त्याचा एक फोटो देखील शेयर करण्यात आला आहे.

या पोस्टमध्ये कंपनीने लिहिले आहे कि, भेटा टकसोन प्राइमला, जो हुंडाई डिलरशिपमध्ये एक सेल्स डॉग आहे. हा नवीन सदस्य आता जवळ जवळ एक वर्षाचा आहे ज्याला हुंदाई कुटुंबामध्ये सामील केले गेले होते आणि याने आपल्या सहकाऱ्यांसोबत ग्राहकांची मने जिंकली आहेत.

इतकेच नाही तर आता चक्क या कुत्र्याच्या नावाने एक वेगळे इंस्टाग्राम अकाउंट देखील बनवले गेले आहे, ज्याचे आता जवळ जवळ २८ हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत आणि यामध्ये दररोज या कुत्र्याचे फोटो शेयर केले जातात जे लोकांना खूपच पसंत येतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने