सब टीव्ही वरील लोकप्रिय शो तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये गेल्या काही दिवसांपासून बदल पाहायला मिळत आहेत. लॉकडाउननंतर पुन्हा सुरु झालेल्या या शोमधील अनेक कलाकारांनी हा शो सोडला आहे. तारक मेहताच्या सोधीनंतर अंजली भाभीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहताने देखील हा शो सोडला आहे. तथापि आता मेकर्सने नवीन अंजली भाभी शोधली आहे. शोमध्ये आता अंजली भाभीची भूमिका सुनैना फौजदार साकारणार आहे. तर सोधीच्या भूमिकेमध्ये बलविंदर सिंह सूरी पाहायला मिळणार आहेत.

नवीन अंजली भाभी आणि सोधी दोघांनी शुटींग सुरु केली आहे. सुनैनाने सोशल मिडियावर तारक मेहताच्या सेटवरील काही फोटो देखील शेयर केले आहेत. तसे रिय लाईफबद्दल बोलायचे झाले तर अंजली भाभी म्हणजेच सुनैना खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

फोटोमध्ये सुनैना तारक मेहता उर्फ शैलेंद्र लोढासोबत पाहायला मिळत आहे. लोक देखील आता तारक मेहतासोबत नवीन अंजली भाभीची ट्युनिंग पाहण्यासाठी उत्सुक आहेत.


फोटो शेयर करून सुनैनाने लिहिले आहे कि सर्व कलाकार आपल्या एंटरटेन करण्यासाठी जगतात. मला अंजली म्हणून स्वीकार करा आणि तारक मेहतामध्ये माझे स्वागत करा. मला तुम्हा लोकांचा सपोर्ट हवा आहे जसे पहिला देखील होता.

सोशल मिडियावर तारक मेहताचा एक प्रोमो देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुनैना आणि बलविंदर पाहायला मिळत आहेत. तथापि जुन्या अंजली आणि सोधी प्रमाणे यांना देखील दर्शकांकडून प्रेम मिळेल कि नाही हे येणाऱ्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल.

सुनैना फौजदार विवाहित आहे. सुनैनाने ४ वर्षांच्या रिलेशन नंतर तिचा बॉयफ्रेंड कुणाल भंबवानी सोबत लग्न केले. कुणाल एक बिजनेसमॅन आहे.


सुनैना फौजदारने आपल्या करियरची सुरुवात स्टार प्लसच्या संतान या शोमधून केली होती. याशिवाय तिने राजा की आएगी बारात, कुबूल है, रहना है तेरी पलकों के छांव में, सीआईडी, सावधान इंडिया, आहट, एक रिश्ताब साझेदारी का, लगी तुझसे लगन आणि फियर फाइल्सु सारख्या शोजमध्ये देखील काम केले आहे.

सुनैना नुसार नेहा मेहता गेल्या १२ वर्षांपासून त्या शोचा भाग होती. तिला रिप्लेस करने सुनैनासाठी इतके सोपे नाही. सुनैना म्हणते कि नेहाची जागा घेणे खूपच कठीण असेल पण मी शोमध्ये माझे १०० टक्के देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

सुरुवातीपासून तारक मेहताचा बह्ग राहिलेली नेहाने नुकतेच शो सोडला आहे. रिपोर्टनुसार नेहा मेहता शो सोडण्याचे कारण तिने करियर आहे. नेहाने निर्णय घेतला आहे कि करियरमध्ये चांगली संधी मिळवण्यासाठी तिने हे केले आहे कारण जेव्हापासून शो सुरु झाला आहे तेव्हापासून नेहा एकाचा भूमिकेमध्ये अडकली आहे.


नेहा मेहताच्या आधी शोची मुख्य अभिनेत्री दिशा वकांनी उर्फ द्या भाभीने शो सोडला होता. अभिनेत्रीने प्रेग्नंसीमुळे तीन वर्षापूर्वी मॅटरनिटी लीव घेतली होती पण आतापर्यंत तिने पुनरागमन केले नाही. अनेक वेळा तिच्या पुनरागमनाचा अंदाज लावला गेला आहे पण अजून तरी तसे झाले नाही. यावर्षी २८ जुलैला तारक मेहता का उल्टा चश्माची १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या शोचे २९८१ एपिसोड प्रसारित केले गेले आहेत. २००८ मध्ये सुरु झालेल्या या शोचे प्रोड्युसर असित कुमार मोदी आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने