सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान सुशांतच्या बॉडीगार्डने एका चॅनेलशी बातचीत करताना अनेक खुलासे केले. बॉडीगार्डने म्हंटले कि सुशांत सिंह राजपूतच्या घरी नेहमी पार्टी होत होती. ज्यामध्ये तो सामील होत नव्हता. घरामध्ये अनेकदा विनाकारण खर्च होत होता. ज्यामध्ये सुशांतचा काहीच संबंध नव्हता. तो नेहमी आजारी असायचा. तो आपल्या खोलीमध्ये झोपलेला असायचा तर त्याच्या घराच्या छतावर पार्ट्या होत असायच्या.

या संपूर्ण प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप होत आहेत. सुशांतच्या वडिलांद्वारे दाखल एफआईआरमध्ये रिया अडकताना पाहायला मिळत आहे. बॉडीगार्डने चॅनेलशी बोलताना सांगितले कि तो नेहमी आजारी असायचा. तो आपल्या खोलीमध्ये झोपलेला असायचा तर त्याच्या घराच्या छतावर पार्ट्या होत असत. पार्टीमध्ये रिया चक्रवर्ती, तिचे वडील, तिची आई, भाऊ आणि दोस्त सामील असायचे. बॉडीगार्डने रिया चार्कावर्तीवर लावलेल्या आरोपावर म्हंटले कि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळाला पाहिजे.

रियाला भेटल्यानंतर सुशांतच्या व्यवहारामध्ये खूपच बदल झाला होता. त्याच्या सर्व स्टाफमध्ये बदल करण्यात आला होता. फक्त मीच एकटा जुन्या स्टाफमधील कर्मचारी राहिलो होतो. बॉडीगार्डने म्हंटले कि सुशांतच्या घरी फक्त रिया चक्रवर्तीच्या कुटुंबियांचे येणे जाणे असायचे. सुशांतचे कुटुंबीय कधी येत नव्हते. पैशाचे सर्व व्यवहार रिया चक्रवर्ती पहायची. अशामध्ये घरामध्ये जितका खर्च होत होता सर्व सुशांतच्या पैशामधून व्हायचा. सुशांतने आपला खर्च खूप कमी केला होता पण जर १५ करोड एका वर्षामध्ये खर्च होत असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे.

सुशांतला औषधांचा ओव्हरडोस देण्याबाबतीतच्या प्रश्नावर बॉडीगार्ड म्हणाला कि आम्हा लोकांना जेव्हा कधी सुशांतला भेटायचे असायचे तेव्हा आम्हाला सांगितले जायचे कि सर झोपले आहेत. पहिला तर सर्व काही ठीक असायचे पण युरोप टूर नंतर त्यांची तब्येत आणखीन खराब होऊ लागली. त्यानंतर ते सतत आजारी राहू लागले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने