सुशांत सिंह राजपूत प्रकरण जस जसे पुढे जात आहे तस तसे नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपासा आता सीबीआई करत आहे आणि त्याचबरोबर ईडी देखील या प्रकरणाच्या तपासामध्ये सामील झाली आहे. जिथे आता प्रकरणामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे नाव फक्त समोर आले होते तर आता त्याच्या एका एक्स गर्लफ्रेंडचा उल्लेख झाला आहे. ईडीच्या तपासामध्ये खुलासा झाला आहे कि सुशांतच्या लाईफमध्ये रिया आणि अंकिताशिवाय आणखी एक मुलगी होती जिच्या फ्लॅटचा हप्ता सुशांत भरत होता. तथापि ती मुलगी कोण आहे याचा खुलासा अजून झाला नाही.

सुशांतच्या नावावर आहे फ्लॅट

ईडीच्या चौकशीमध्ये जितक्या देखील गोष्टी समोर आल्या आहेत त्याच्या सत्यतेची पडताळणी केली जात आहे. पण सूत्रांच्या म्हणणे आहे कि, ज्या फ्लॅटचा हप्ता सुशांत भरत होता तो त्याच्याच नावावर आहे आणि ज्या बँक अकाऊंटमधून पैसे जात होते त्यामध्ये आतादेखील ३५ लाख रुपये शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.

रिया चक्रवतीवर प्रश्नांचा भडीमार

जिथे या प्रकरणामध्ये एक नवीन मुलीची गोष्ट समोर आली आहे तर दुसरीकडे ईडीने रिया चक्रवर्तीच्या चौकशीमध्ये एक नाही तर अनेक कडवट प्रश्न विचारले आहेत. या प्रकरणामध्ये रिया आणि कुटुंब संशयित मानले जात आहेत. अभिनेत्याचे वडील केके सिंह यांनी आपल्या एफआईआरमध्ये रियावर सुशांतचे पैसे हडप केल्याचा आरोप लावला आहे. ईडीने रियाची दोनवेळा चौकशी केली आहे आणि जेव्हा त्यांना रियाच्या उत्तरांवर संतुष्टि मिळाली नाही तेव्हा अॅक्शन घेताना रिया सहित वडील-भाऊ दोघांचे फोन जप्त केले आहेत ज्यामुळे पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही.

ईडी काय तपासेल

रिया आणि तिचे वडील आणि भाऊ यांचे फोन जप्त करण्यावर सूत्रांनी सांगितले कि, एजन्सीला हे पहायचे आहे कि रिया आणि सुशांत किंवा सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये जे मॅसेज शेयर झाले त्यांना डिलीट करण्याचा तर प्रयत्न झाला नाही. कारण या दिवसांमध्ये दोन्ही पक्ष सोशल मिडियावर आपल्या आपल्या गोष्टी मांडत आहेत आणि जेव्हा रियाने सुशांतची चॅट शेअर केली तेव्हा तिला ट्रोल केले जाऊ लागले.

ईडीने मागितला बँकांचा तपशील

सूत्रांच्या माहितीनुसार चौकशीमध्ये रियाने ऑक्टोबर २०१९ मधील इटली ट्रीपचा देखील उल्लेख केला आहे. रिया म्हणाली कि तिने सुशांतला हॉटेलच्या रूममध्ये उदास पाहिले होते. सुरुवातीपासूनच असे प्रश्न उपस्थित होत आहेत कि जेव्हा सुशांत रियासोबत इटलीला गेला होता तेव्हापासूनच तो उदास होता. पण सोशल मिडियावर असलेले फोटो काही वेगळंच सांगतात. असो ईडीच्या सूत्रांनी हा देखील खुलासा केला आहे कि आतापर्यंत रिया, शौविक आणि वडील इंद्रजीत यांनी आपल्या संपत्तीची माहिती ईडीला दिलेली नाही. यामुळे ईडीने बँक अधिकाऱ्यांना संपत्तीची कागदपत्रे मागितली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने