सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला १४ ऑगस्टला दोन महिने पूर्ण होतील, पण अजूनपर्यंत या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. चाहते आणि स्टार्स सतत सुशांतसाठी न्यायाची मागणी करत आहेत. मुलाला न्याय देण्यासाठी या मोहिमेमध्ये सुशांतचे कुटुंब देखील पुढे आले आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ति देखील सतत भावासाठी न्यायाची मागणी करत आहे. नुकतेच पुन्हा एकदा श्वेताने इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर करून भावासाठी न्यायासाठी मागणी केली आहे.

शेयर केलेल्या या फोटोमध्ये श्वेता हातामध्ये एक व्हाईट बोर्ड घेतलेली पाहायला मिळत आहे. या बोर्डवर तिने लिहिले आहे कि, मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आहे आणि मी या प्रकरणामध्ये सीबीआई चौकशीची मागणी करते.

हा फोटो शेयर करताना श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, हि वेळ आहे सत्य बाहेर यावे आणि न्याय मिळावा. कृपया आमच्या कुटुंबाला आणि संपूर्ण जगाला हे जाणून घेण्यासाठी मदत करा कि सत्य काय आहे. अन्यथा आम्ही कधीही शांततापूर्ण जीवन जगू शकणार नाही. सुशांतसाठी सीबीआई चौकशीसाठी आवाज उठवा.

याआधी देखील श्वेताने पीएम मोदींना भावाला न्याय मिळवून देण्यासाठी अपील केली होती. सुशांतसाठी न्याय मिळवून देण्यासाठी चालवलेल्या प्रत्येक मोहिमेमध्ये श्वेता भाग घेते. अलीकडेच तिने #WARRIORS4SSR मध्ये भाग घेतला होता. श्वेताने हातामध्ये एक व्हाइट बोर्ड घेतला होता. यामध्ये लिहिले होते कि, आम्ही जिंकू, लव्ह यु भाई. देव आमच्यासोबत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने