सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आतापर्यंत सु सा इ ड सांगितले जात आहे ज्यामुळे असे मानले जात आहे कि सुशांतने डि प्रे श नमुळे सु सा इ डकेले. तथापि कुटुंबियांबरोबरच अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे कि सुशांत सिंह राजपूतने डि प्रे श नमुळे सु सा इ डकेले नाही आणि सुशांतचे कुटुंब असे प्रत्येक पाऊल उचलत आहे ज्यामुळे सुशांतला न्याय मिळू शकेल. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने इंस्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे ज्यामध्ये सुशांतच्या निधना अगोदर २३ दिवसांपूर्वी तिची सुशांतसोबत व्हॉट्सअपवर बातचीत झाली होती.

श्वेताने शेयर केला २२ मेचा व्हॉट्सअप चॅट

या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे कि श्वेता सुशांतला एक फोटो पाठवते ज्यामध्ये चारी बहिणी वर्चुअल वेदांता क्लास अटेंड करताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी आपल्या मॅसेजमध्ये लिहिले आहे कि – लव्ह यु भाई, मिस यु. यावर सुशांतने देखील रिप्लाय केला आणि लिहिले, लव यू टू. हे खूपच छान आहे. याच चॅटमध्ये श्वेताने आपल्या फॅमिली आणि मुलांचा एक व्हिडिओ शेयर केला ज्याला सुशांतने रिप्लाय मध्ये म्हंटले आहे कि – वा किती सुंदर आणि आनंदी फॅमिली आहे. प्लीज विशालला माझे हाय सांग आणि क्युट मुलांना माझे प्रेम दे.

श्वेता सतत सुशांत संबंधित पोस्ट्स सोशल मिडियावर शेयर करत आहे. तिने याआधी देखील एक पोस्ट शेयर केली होती आणि स्पष्ट केले होते कि सुशांत पुढच्या आयुष्याबद्दल विचार करत होता. या फोटोमध्ये सुशांतचा शेड्यूल लिहिला होता. या फोटोमध्ये एक व्हाइट बोर्ड दिसत आहे ज्यामध्ये सुशांतने आपले रुटीन लिहिले होते. फोटोमध्ये कॅप्शनमध्ये श्वेताने लिहिले कि सुशांत २९ जून पासून एक खास प्रकारचा मेडिटेशन करणार होता. तो पुढचा विचार करत होता. याआधी सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआई कडे सोपवल्याबद्दल श्वेताने आनंद व्यक्त केला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने