सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी आज मुंबई पोलिसांनी अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. सोमवारी मुंबई पोलिस कमिशनर परमबीर सिंह यांनी सांगितले कि सुशांतने सु सा ई डच्या आधी गुगलवर अनेक गोष्टी सर्च केल्या होत्या. यामध्ये बाइपोलर डिसॉर्डर, स्किझोफ्रेनिया, पेनलेस डेथ (वेदनादाई मृत्यू) आणि आपले नाव सामील आहे. बाइपोलर डिसॉर्डर आणि स्किझोफ्रेनिया गंभीर मानसिक आजार आहेत आणि या आजारांचे नेहमी घातक परिणाम समोर येतात.

परमबीर सिंह यांनी सांगितले कि सुशांतच्या सु सा ई डच्या दिवशी म्हणजे १४ जूनला त्याचा फ्लॅट सील केला होता तिथे फॉरेन्सिक टीम १५ जून रोजी पोहोचली होती. याशिवाय फ्लॅटमध्ये डॉक्टर्स देखील पोहोचले होते. यानंतर या फ्लॅटला सील केले गेले होते. आमचे स्टेटमेंट्स सांगिते कि जेव्हा सुशांतचे नाव दिशा सालियान प्रकरणामध्ये सामोर आले होते तेव्हा तो खूपच डिस्टर्ब झाला होता.

ते पुढे म्हणाले कि सुशांत दिशाला फक्त एकदा भेटला होता. त्यांनी दिशाच्या वकिलाला मॅसेज देखील केला होता कि या प्रकरणामध्ये माझे नाव का घेतले जात आहे. सुशांतच्या गुगल हिस्ट्रीबद्दल बोलायचे झाले तर त्याने वेदनादाई मृत्यू, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया आणि आपले नाव गुगलवर सर्च केले होते.

प्रेस कॉन्फ्रेंस दरम्यान पोलीस कमिशनरांनी सांगितले कि सुशांतच्या कुटुंबाने १६ जूनला आपल्या जबाबामध्ये सांगितले होते कि या प्रकरणामध्ये कोणावरहि शंका उपस्थित होत नाही. कमिशनरनुसार रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतचे घर ८ जूनला सोडले होते, कारण ती देखील डि-प्रेस्ड होती. तिची तब्येत ठीक नव्हती, म्हणून ती निघून गेली. यानंतर सुशांतची बहिण आली आणि ती देखील १३ जूनला निघून गेली कारण तिच्या मुलीच्या परीक्षा होत्या.

कमिशनरनुसार रियाचा दोन वेळा जबाब नोंदवला गेला ज्यामध्ये समोर आले आहे कि त्यांच्या नात्यामध्ये काही मतभेत होते. त्यांच्या भेटण्याच्या स्टोरीपासून सुशांतच्या मानसिक आजाराबद्दल आणि काही घटनांबद्दल तिने सांगितले. आम्ही सर्व गोष्टीची क्रॉस चेकिंग देखील केली. रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या कुटुंबामध्ये थोडेसे मतभेत होते.

सुशांतचा थेरपिस्टचा मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी सुशांतच्या थेरपिस्टने सांगितले होते कि तो मानसिक आजाराने ग्रस्त आहे आणि रिया त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यांनी असे देखील सांगितले कि गेल्या काही काळामध्ये त्यांच्या क्लायंटबद्दल पसरवल्या जात असलेल्या अनेक प्रकारच्या अफवांवर पूर्णविराम लावण्यासाठी त्या समोर आल्या आहेत. या महिला थेरपिस्टचे विधान समोर आल्यानंतर सुशांतच्या जिजाने एक ब्लॉग लिहिला होता आणि या थेरपिस्ट आणि रियावर प्रश्न उपस्थित केले होते.

विशालने या ब्लॉगमध्ये म्हंटले होते कि थेरेपिस्ट द्वारे आपल्या क्लाइंट(सुशांत) ची मेडिकल हिस्ट्री पब्लिक करने फक्त क्लाइंट गोपनीयतेचा भंग नाही नाही तर ते बेकायदेशीर देखील आहे. ते म्हणाले कि अवघ्या ३-४ महिन्यामध्ये आणि काही अपॉइन्टमेंट्सच्या सहाय्याने हे थेरेपिस्ट सुशांतच्या मेंटल हेल्थ बद्दल कोणतेही दावे करू शकत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने