बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी एक राहिला आहे. आपल्या काळामध्ये तो हिट अभिनेता राहिला होता. सुनील शेट्टीने आपल्या करियरमध्ये अनेक चित्रपट केले. त्याने फक्त अॅ क्शन चित्रपटच नाही तर कॉमेडी चित्रपटांमध्ये देखील नशीब आजमावले आणि त्यामध्ये सफल देखील झाला. त्याच्या कॉमेडी चित्रपटामधील हेरे फेरी चित्रपट तर आज देखील सुपरहिट आहे. आज आपण सुनील शेट्टीबद्दल काही रंजक माहिती जाणून घेणार आहोत.

सुनील शेट्टी बॉलीवूडमधील खूप मोठे नाव आहे. पण तुम्हाला माहिती आहे का कि बॉलीवूडमध्ये सुनील शेट्टीला अण्णा म्हणून ओळखले जाते. सुनील शेट्टीचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी म्हैसूर येथे झाला होता.

आज भलेहि सुनील शेट्टीची ओळख एक अभिनेता म्हणून आहे पण सुनील शेट्टीला अभिनेता बनायचे नव्हते. त्याचे स्वप्न होते क्रिकेटर बनायचे. पण नशीब त्याला चित्रपटांमध्ये घेऊन आले. आज तो एक अभिनेता तर आहेच पण त्याचबरोबर एक सफल होटेलिएर आणि बिजनेसमन देखील आहे.

सुनील शेट्टीने आपल्या करियरची सुरुवात १९९२ मध्ये बलवान चित्रपटामधून केली होती. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दिव्या भारती देखील मुख्य भूमिकेमध्ये होती. असे म्हंटले जाते कि सुनील शेट्टीसोबत काम करण्यासाठी अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी नकार दिला होता. कारण सुनील शेट्टी बॉलीवूडमध्ये नवीन होता आणि बॉलीवूड अभिनेत्र्या कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नव्हत्या.

तथापि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला. या चित्रपटामधून सुनील शेट्टीला एक अॅिक्शन हिरो म्हणून ओळख मिळाली. असे म्हंटले जाते कि त्याचा डेब्यू चित्रपट एक और फौलाद होणार होता. पण हा चित्रपट कधी बनू शकला नाही.

यानंतर सुनील शेट्टी मोहरा चित्रपटामध्ये पाहायला मिळाला, जो कि त्याच्या करियरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. यानंतर सुनील शेट्टीने गोपी किशन चित्रपटामध्ये डबल रोल केला. हा चित्रपट देखील हिट झाला. सुनील शेट्टी बॉलीवूडमध्ये एक अॅिक्शन हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला. पण कॉमेडी चित्रपटांमध्ये देखील त्याने नाव कमवले. जसे हेर फेरी, दे दना दन आणि ये तेरा घर ये मेरा घर. २००१ मध्ये आलेल्या धडकन चित्रपटामुळे त्याला बेस्ट व्हिलनचा फिल्मफेर अॅवॉर्ड मिळाला होता. याच्या काही काळानंतर त्याच्या करियरचा ग्राफ खाली पडत गेला आणि त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. यानंतर त्याचे सोलो ऐवजी मल्टीस्टारर चित्रपट येऊ लागले.

सध्या सुनील शेट्टी चित्रपटांमध्ये खूप कमी पाहायला मिळतो. सध्या तो बिजनेसमध्ये आपला जास्त वेळ घालवत असतो. त्याने पुण्याच्या एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय मुंबईमध्ये त्याचे ३ ते ४ आलिशान हॉटेल आहेत. शिवाय स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे.

त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने चित्रपटामध्ये येण्यापूर्वी मानासोबत लग्न केले होते. ते ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. माहितीनुसार माना आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझायनर कंपनी चालवते. सुनील शेट्टीला दोन मुले आहेत अथिया आणि अहान शेट्टी. अथियाने बॉलीवूडमध्ये काही चित्रपट केले आहेत तर अहान लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने