बॉलीवूडची सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री महिमा चौधरी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. १३ सप्टेंबर १९७३ रोजी दार्जीलिंगमध्ये तिचा जन्म झाला होता. महिमाने १९९७ मध्ये परदेस चित्रपटामधून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. ज्या चित्रपटामध्ये शाहरुख खान तिच्यासोबत मुख्य भूमिकेमध्ये होता. या चित्रपटामधून महिमा रातोरात लोकप्रिय झाली होती. या चित्रपटाने तिला सुपरस्टार बनवले. तथापि या चित्रपटानंतर तिचे करियर काही खास राहिले नाही.


परदेस चित्रपटासाठी सुभाष घईने ३००० पेक्षा जास्त मुलींचे ऑडिशन घेतले होते. यानंतर महिमा चौधरीची निवड करण्यात आली होती. खूपच कमी लोकांना हे माहिती आहे कि महिमा चौधरीचे खरे नाव रितू चौधरी आहे. सुभाष घईने महिमा चौधरीला आपल्या चित्रपटामध्ये घेण्यासाठी तिचे नाव रितू चौधरी बदलून महिमा चौधरी ठेवले होते कारण ते तिला आपले लकी चार्म मानत होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी महिमा चौधरीने जाहिरातींमध्येही काम केले.


महिमा चौधरीने ६ वर्षांपर्यंत सुप्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेसला डेट केले. पण काही कारणांमुळे दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर महिमा चौधरीने लिअँडर पेसवर फसवणूक केल्याचा आरोप लावला. तिने म्हंटले कि तो जरासुद्धा चांगला व्यक्ती नाही. त्याने मला धोका दिला. लिअँडर पेसने संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लई सोबत लग्न केले होते.


तर महिमा चौधरीने २००६ मध्ये आर्टिटेक्ट आणि बिजनेसमॅन बॉबी मुखर्जी सोबत लग्न केले. २०१३ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगी देखील आहे जिचे नाव रियाना आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने