१९९९ मध्ये प्रदर्शित झालेला महानायक अमिताभ बच्चनचा सुर्यवंशम चित्रपट तर तुम्ही पाहिलाच असेल. हा चित्रपट आजच्या सर्वात चर्चित चित्रपटांमधील एक आहे. हा चित्रपट प्रत्येक दोन तीन दिवसांनी सोनी मॅक्सवर प्रसारित केला जातो. अमिताभ बच्चन शिवाय या चित्रपटामध्ये साउथची प्रसिद्ध अभिनेत्री सौंदर्या रघु देखील मुख्य भूमिकेमध्ये होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ५ वर्षांनी सौंदर्या रघुचा मृत्यू झाला होता. जेव्हा सौंदर्या रघुचा मृत्यू झाला होता तेव्हा ती प्रेग्नंट होती. तिच्या कुटुंबियांना तिचा मृतदेह देखील मिळाला नव्हता.

१७ एप्रिल २००४ ची हि गोष्ट आहे. ती भाजप खासदार आणि तेलगु देशम पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी करीमनगरला जात होती. सौंदर्या रघु ज्या फोर सीटर प्राइवेट एयरक्राफ्टने जात होती त्याने ११.०५ वाजता बेंगळुरूमधील जक्कूर एअरफील्डवरून उड्डाण केले. १०० फूट वर गेल्यानंतर एयरक्राफ्ट क्रॅश झाले. त्यामध्ये सौदर्यासोबत तिचा भाऊ अमरनाथ, हिंदू जागरण समितिचे सेक्रेटरी रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप होते.

या घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. सौंदर्या रघुचा मृत्यू झाला होता तेव्हा ती ३१ वर्षांची होती. तिचे खरे नाव सौम्या सत्यनारायण होते. १८ जुलै १९७२ रोजी कर्नाटकच्या कोलारमध्ये सौंदर्या रघुचा जन्म झाला होता. तिचे वडील इंडस्ट्रियलिस्ट आणि कन्नड चित्रपटांचे लेखक होते, ज्यांचे नाव के. एस. नारायण होते.

मृत्यूच्या ठीक १ वर्षापूर्वी म्हणजेच २००३ मध्ये सौंदर्याने सॉफ्टवेयर इंजीनियर जी. एस. रघु सोबत लग्न केले होते. बातमीनुसार २०१० मध्ये जी. एस. रघुने अर्पिता नावाच्या मुलीसोबत दुसरे लग्न केले. १९९८ मध्ये सौंदर्या रघुला प्रश्न विचारला गेला होता कि तिला नेहमी अभिनेत्री व्हायचे होते का? तेव्हा सौंदर्याने रघुने सांगितले होते कि चित्रपट तिच्या मनामध्ये शेवटची गोष्ट होते. माझे वडील चित्रपट निर्माते होते. मी त्यांच्यासोबत चित्रपटाच्या सेट्सवर जायचे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने