सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत, काही अशा गोष्टी देखील आहेत ज्याला इग्नोर केले गेले, अफवा समजले गेले. सुशांतची पर्सनल लाईफ जोरदार चर्चेमध्ये आहे. तो जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आला होता तेव्हा अंकिता त्याची गर्लफ्रेंड होती. पण हे नाते सुशांतच्या बॉलीवूड डेब्यूनंतर कमजोर पडत गेले, यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये एकामागून एक अनेक लोक आले. यामध्ये अनेक एक्ट्रेेसेस ची नावे सामील होती, पण सुशांत आणि साराच्या अफेयरच्या बातम्या अफवा नव्हत्या, असे त्याचा मित्र - एक्स फ्लॅटमेटने खुलासा केला आहे.

सुशांत आणि सारा एकमेकांवर प्रेम करत होते

सुशांतचा फ्लॅटमेटने सॅम्युएल हाओकिपने इंस्टायग्रामवर एक मोठा खुलासा केला आहे. सॅम्युएलनुसार केदारनाथ चित्रपटादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूतची लव्ह स्टोरी ऑन स्क्रीन होण्यासोबतच ऑफ स्क्रीन देखील चालू होती. तथापि यादरम्यान दोघांच्या डेट करण्याच्या देखील अफवा होत्या पण यावर जास्त लक्ष दिले गेले नाही. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नेहमी अशा बातम्या बनवल्या जातात, पण मित्राच्या खुलास्याने सर्वाना हैराण केले आहे आणि विचार करण्यास भाग पाडले आहे.

सॅम्युएलची पोस्ट

सुशांत सिंह राजपूतचा फ्लॅटमेट सॅम्युएल हाओकिपने लिहिले आहे, मला आठवते कि केदानाथच्या प्रमोशनदरम्यान सारा आणि सुशांत प्रेमात होते. दोघांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल सन्मान होता, जो सध्याच्या नात्यामध्ये कमीच पाहायला मिळतो. त्याने पुढे लिहिले, साराला सुशांतसोबत त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांबद्दल देखील सन्मान होता. मग ते कुटुंब असो, मित्र असो किंवा कर्मचारी असो. मला हैराणी आहे कि सोनचिडियाच्या बॉक्स ऑफिस प्रदर्शनानंतर साराचा सुशांतसोबत ब्रेकअपचा निर्णय बॉलीवूड माफियाच्या एखाद्या दबावाखाली घेतला गेला होता का?

कंगना रनौतने देखील केले ट्वीट

सॅम्युएलच्या या खुलास्यानंतर मिडियामध्ये सारा आणि सुशांतच्या अफेयरच्या बातम्या चर्चेमध्ये आहेत. कंगना रनौतने देखील ट्वीट करून यावर भाष्य केले आहे. कंगनाने ट्वीट करून साराला फॅन्सीू नेपो कीड म्हंटले आहे. कंगनाने हे देखील म्हंटले कि चित्रपटाच्या शुटींग दरम्यान कदाचित दोघांनी रूम देखील शेयर केली असेल. कंगनाने म्हंटले कि हे नेपो किड्स आउटसाइडर्सला प्रेमाचा खोटा दिखावा का दाखवतात? आणि नंतर त्यांना सार्वजनिक रूपाने डम्पउ करून त्यांचा अपमान करतात.

साराने केली होती पोस्ट

सुशांतच्या निधनानंतर सारा अली खानने सुशांतचा एक सुंदर फोटो शेयर केला होता. हा फोटो चित्रपटाच्या शुटींग दरम्यान होता. सारा अली खानने केदारनाथच्या सेटवरील एक हसरा फोटो शेयर केला होता यानंतर तिने सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा रिलीज झाल्यानंतर आपले वडील सैफ अली खानसोबत सुशांतचा एक फोटो शेयर केला होता. तिने सुशांतची तुलना आपल्या वडिलांसोबत केली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने