संजय दत्तला फुफुसाचा कँ-सर झाला आहे, दोन दिवसांपूर्वी तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. कुटुंबाकडून स्पष्ट केले गेले आहे कि हे एक रेगुलर चेकअप आहे, संजय लवकरच घरी येईल, पण मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या या बातमीने चाहत्यांचा धक्का बसला आहे. संजय दत्त कँ-सरग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. संजय दत्त कँ-सरग्रस्त असल्याचे सांगितले गेले आहे, तथापि याबद्दल अजून देखील अधिक माहिती समोर आलेली नाही.

संजय दत्तकडून ट्वीट

संजय दत्तने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन चाहत्यासाठी संदेश सोडला आहे. यामध्ये लिहिले आहे कि, हेलो मित्रांनो, मी कामातून काही दिवसांसाठी ब्रेक घेत आहे, काही मेडिकल ट्रीटमेंट साठी. माझे कुटुंब आणि मित्र सोबत आहेत. मी माझ्या शुभचिंतकांना विनंती करतो कि कोणत्याही प्रकारच्या बातमीने अस्वस्थ होऊ नका. तुमचे प्रेम आणि आशीर्वादाने मी लवकरच ठीक होऊन परत येईन.

युवराजने केले ट्वीट

संजय दत्तला कँ-सर असल्याची बातमी सोशल मिडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाली. मित्र, शुभचिंतक सर्व त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. तर कँ-सरला हरवलेला क्रिकेटर युवराज सिंहने देखील ट्वीट केले, त्याने संजय दत्तला फाईटर म्हणत ट्वीट केले, संजय दत्त तू नेहमी फाईटर राहिला आहेस, मला माहित आहे कि यामुळे खूप वेदना होतात, पण मला हे देखील माहित आहे कि तू मजबूत आहेत आणि या कठीण काळाला नष्ट करशील. तू लवकर बरा व्हावा म्हणून मी प्रार्थना करतो. युवराजला वर्ल्ड कप २०११ दरम्यान कँ-सर झाला होता, ज्यावर त्याने मात केली होती.

आई नरगीस आणि पत्नी रिचाला देखील होता कँ-सर

संजय दत्तची आई नरगीसचा मृत्यू देखील कँ-सरमुळे झाला होता, त्याची पत्नी रिचा शर्मादेखील कमी वयामध्ये कँ-सरग्रस्त झाली होती. संजयच्या मुलीचे वय खूपच कमी होते, जेव्हा रिचा तिला सोडून गेली होती आणि आता संजय दत्त स्वतःसुद्धा या गंभीर आजाराच्या विळख्यात सापडला आहे. संजय दत्तच्या आजाराबद्दल सध्या अधिक माहिती समोर आलेली नाही. पण संजय दत्त साठी अनेक प्रार्थना करण्यात येत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने