सैफ अली खान ५० वर्षांचा झाला आहे, यानिमित्ताने करीनाने त्याला एक सुंदर भेट देखील दिली आहे. काही दिवसांपूर्वीच या जोडीने जाहीर केले होते कि ते पुन्हा पॅरेंट बनणार आहेत. सैफचा हा वाढदिवस कोरोनामुळे घरामध्येच सेलिब्रेट केला गेला. पण करीनाने याला सुंदर बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. करीनाने एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे ज्यामध्ये सर्व जुन्या आठवणी एकत्र केल्या आहेत. सैफ आणि करीना कसे एकमेकांचा जवळ आले हा देखील एक रोचक किस्सा आहे.

सैफने केले होते प्रपोज, एकदा नव्हे दोनवेळा

करीना कपूर खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, सैफने तिला ग्रीसमध्ये प्रपोज केले होते पण तिने होकार दिला नव्हता. करीनाला सैफला चांगले जाणून घ्यायचे होते यामुळे तिने दोन वेळा सैफला काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सैफने करीनाला तेव्हा म्हंटले होते, आपल्याला लग्न करायला हवे. त्याने करीनाला ग्रीसमध्ये प्रपोज केले, नंतर लदाखमध्ये लग्नाची चर्चा केली. पण करीनाला आणखीन थोडा वेळ हवा होता, जेणेकरून ती सैफला पूर्णपणे समजू शकेल.

आयुष्यातील सर्वात सुंदर निर्णय, सैफ सोबत लग्न करणे

सैफ अली खानसोबत लग्न करणे करीना कपूर खान आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर निर्णय मानते. करीनानुसार सैफ तिच्यासाठी परफेक्टल हसबंड आहे. त्याच्यामध्ये ते सर्व गुण आहेत जे तिला आपल्या पतीमध्ये हवे होते. सैफच्या वयाचे अंतर त्यांच्या लग्नाचे चार्म आहे, त्यांच्या हॅपी लाईफचा कदाचित हाच मंत्र आहे. सैफ आणि करीना जितके चर्चेमध्ये राहतात त्यापेक्षा जास्त लोकप्रियता या सेलेब कपलचा मुलगा तैमुरने देखील मिळवली आहे.

सैफशिवाय राहू शकत नाही करीना

करीना कपूर खानने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि सैफ घरी असतो तेव्हा ती खूपच खुश असते. तिचे म्हणणे आहे कि ज्यावेळी तो घर सोडून कुठेतरी जातो तेव्हा तिला खूपच वाईट वाटते. तिने म्हंटले कि सैफला ती खूप मिस करते. करीनाच्या आयुष्यामध्ये सैफच्या अगोदर शाहिद कपूर होता, २००७ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले आणि ती सैफच्या जवळ आली. ओमकारा चित्रपटानंतर दोघांमध्ये जवळीक खूपच वाढली होती.

अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी

जेव्हा देखील करीना आणि सैफचे सीन एकत्र होत नव्हते तेव्हा देखील ते सेट वर असायचे. यानंतर तर सैफ आणि करीना मधील जवळीक यशराज बॅनरचा चित्रपट टशननंतर आणखीनच वाढली होती. हे दोघे शुटींग मधून वेळ काढून वॉकवर जात असत. यानंतर मिडियामध्ये देखील त्यांच्या अफेयरच्या चर्चा होऊ लागल्या. लॅक्मे फॅशन वीकदरम्यान सैफ आणि करीना पहिल्यांदाच गाडीमध्ये एकत्र आले होते. यादरम्यान सैफने प्रथमच कबूल केले होते कि तो करीनाला डेट करत आहे. यानंतर संपूर्ण देशामधील मिडियामध्ये हि जोडी चर्चेमध्ये राहिली होती.

२०१२ मध्ये केले होते लग्न

यानंतर २०१२ मध्ये हि गोष्ट समोर आली कि सैफ आणि करीना लवकरच लग्न करणार आहेत. तथापी यानंतर सैफ अली खान आणि करीना कपूरने २०१२ मध्ये लग्न केले. सैफ आणि करीनाचा एक मुलगा आहे तैमुर अली खान, तैमुरचा जन्म २०१६ च्या डिसेंबरमध्ये झाला होता. तैमुर फेवरेट स्टाुर किड आहे आणि आता आणखीन एक पाहुणा या घरामध्ये येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने