सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये सीबीआईने तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी ईडीने सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची अनेक तास चौकशी केली. चौकशीच्या काही तासानंतर रिया चक्रवर्तीने सुशांतच्या डायरीचे एक पान आणि सिपर (पाण्याची बाटली) सोशल मिडियावर शेयर केली आहे. ज्यामध्ये रियाने दावा केला आहे कि, त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी सुशांतनेच लिहिल्या आहेत. रियाने सुशांतची ग्रेटिट्यूड लिस्ट असल्याचा दावा केला आहे.

सुशांतची ग्रेटिट्यूड लिस्ट

शनिवारी रियाने सुशांतच्या डायरीचे एक पान सोशल मिडियावर शेयर केले. ज्यामध्ये तिने सुशांतची ग्रेटिट्यूड लिस्ट सांगितले आहे. यामध्ये लिहिले आहे कि, मी आपल्या जीवनामध्ये आभारी आहे. मी माझ्या जीवनामध्ये लिलूचा आभारी आहे. मी माझ्या जीवनामध्ये बेबूचा आभारी आहे. मी माझ्या जीवनामध्ये सरांसाठी आभारी आहे. मी माझ्या जीवनामध्ये आईसाठी आभारी आहे. मी माझ्या जीवनामध्ये दोस्तांसाठी आभारी आहे. हे सर्व माझ्या आयुष्यामध्ये आल्यामुळे मी खूप खुश आहे.

रिया चक्रवर्तीचा दावा – सुशांतची हि प्रॉपर्टी आहे माझ्याजवळ

एका टीव्ही चॅनेलशी बोलताना रियाने सांगितले कि, माझ्या जवळ सुशांतची फक्त एकच वस्तू आहे ती म्हणजे सिपर (पाण्याची बाटली). या ब्लॅक सिपरवर त्याच्या छिछोरे चित्रपटाचे नाव आहे. रियाने एका न्यूज वेबसाईटला सांगितले कि, हे त्यानेच (सुशांतने) लिहिले आहे. लिलू माझा भाऊ शौविक चक्रवर्ती आहे, बेबू मी आहे, सर माझे वडील आहे, मॅम माझी आई आहे आणि फज त्याचा कुत्रा आहे. या ग्रेटिट्यूड लिस्टला सुशांतने डायरीमध्ये लिहिले होते.

सुशांत सिंह राजपूतची पर्सनल डायरी आली समोर

सुशांत सिंह राजपूतची पर्सनल डायरी समोर आली आहे. एका न्यूज वेबसाईटने सांगितले कि हि सुशांतची पर्सनल डायरी आहे, ज्यामध्ये काही महत्वाची पाने फाटलेली आहेत. या डायरीबद्दल सुशांतच्या जवळच्या मित्राने देखील सांगितले होते. या डायरीमध्ये काही नावे देखील आहेत, पण काही महत्वाची पाने फाटली आहेत. तर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने मिडिया चॅनलशी बोलताना सांगितले होते कि त्याच्या समोर पोलिसांनी कोणत्याही डायरीची पाने फाडली नाहीत.

२० डायरी पोलिसांना सोपविल्या

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने सांगितले कि मुंबई पोलिसांनी त्याला सुशांतची डायरी आणि नोटबुक मागितले होते. त्याने जवळ जवळ २० डायरी पोलिसांना सोपविल्या होत्या. त्याने सांगितले कि खोलीमध्ये काही पानांचे तुकडे पडले होते. सुशांतच्या खोलीच्या खाचेमध्ये काही चिट्स देखील होते. पोलिसांनी चौकशी दरम्यान त्याचे फोटो घेतले होते. तर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंहने मिडियाशी बोलताना सांगितले होते कि या डायरीमध्ये महत्वाची माहिती असू शकते. या डायरीमुळे हे समजू शकते कि सुशांतच्या मनामध्ये काय चालू होते. त्यांनी सांगितले कि हि डायरी खूपच महत्वाची आहे. तथापि डायरीच्या फाटलेल्या पानांबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने