रेखा जितकी आपल्या सौंदर्यामुळे आणि चित्रपटामुळे प्रसिद्ध आहे तितकीच ती पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेमध्ये राहत असते. रेखाचे चित्रपटांपेक्षा तिच्या रिलेशनचे किस्से खूप आहेत. रेखाचे पहिले पती विनोद मेहरा होते, ज्याची मुलगी सोनियादेखील एक अभिनेत्री बनली आहे.

तिसऱ्या पत्नीची मुलगी आहे सोनिया

वास्तविक रेखाने विनोदसोबत गुपचूप लग्न केले होते, असे म्हंटले जाते कि विनोद मेहराच्या आईला हे नाते मंजूर नव्हते. ज्यामुळे हे नाते जास्त काळ टिकले नाही. कौटुंबिक दबावामुळे विनोद मेहरा रेखापासून विभक्त झाला. रेखापासून वेगळे झाल्यानंतर विनोद मेहराने तीन लग्ने केले. सोनिया विनोद मेहराची तिसरी पत्नी किरणची मुलगी आहे.

मुलीच्या बालपणी वडिलांचा मृत्यू

सोनिया जेव्हा ४ वर्षांची होती तेव्हा विनोद मेहराचे निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर सोनियाचे संगोपन तिच्या आजी-आजोबांनी केले. १७ वर्षांची झाल्यानंतर ती मुंबईला आली आणि अनुपम खेरच्या इंस्टीट्यूट एक्टर प्रीपेयर्समधून ३ महिन्याचा कोर्स केला.

चित्रपटांमध्ये डेब्यू

सोनिया मेहराने विक्टोरिया नं. २०३ चित्रपटामधून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. तिने आतापर्यंत जवळ जवळ ४ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती रागिनी एमएमएस २ चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. सोनिया इंस्टापग्रामवर आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो नेहमी शेयर करत असते. तिच्या फोटोंसोबत कॅप्शटनदेखील उत्कृष्ठ असतात. सोनियानुसार तिने आता स्वतःला शोधले आहे आणि आता ती एक उत्तम आयुष्य जगत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने