२००१ मध्ये अभिनेता रणदीप हुड्डाने डायरेक्टर मीरा नायरचा चित्रपट मॉनसून वेडिंग मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या वेगळ्या शैलीच्या भूमिकांमधून रणदीपने सर्वांचे मन जिंकले. हाईवे चित्रपटामधून एका ट्रक ड्राईवरच्या भूमिकेमधून दर्शकांचे मन जिंकले तर सरबजीत चित्रपटामध्ये कमालीचा शारीरिक बदल करून त्याने सिद्ध केले कि तो जबरदस्तु अभिनय क्षमतेचा मालक आहे.

हरियाणाचा आहे रणदीप हुड्डा

रणदीप हुड्डा हरियाणाच्या रोहतक मधून आहे. २० ऑगस्टला जन्मलेल्या रणदीपचे बालपण भावनिक अडचणींनी भरले होते. त्याचे आई-वडील वेगळे झाले होते, वडिलांनी रणदीपला आजीजवळ सोडून कामासाठी मिडिल ईस्ट गेले. एका मुलाखतीदरम्यान रणदीपने म्हंटले होते कि त्याला त्यावेळी असे वाटले होते कि त्याच्या आई-वडिलांनी त्याला धोखा दिला. रणदीपचे प्राथमिक शिक्षण सोनीपतच्या बोर्डिंग स्कूलमधून झाले. शालेय दिवसांमध्ये त्याला रणदीप डॉन हुड्डा म्हणून ओळखले जात होते. रणदीपने लहानपणीच स्कूल प्रोडक्शनमध्ये अॅक्टिंग करायला सुरुवात केली होती.

मेलबर्नमध्ये घेतले उच्च शिक्षण

रणदीप हुड्डा पुढचे शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्नला गेला. तेथे त्याने ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट मधून पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली. रणदीप हुड्डाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि ऑस्ट्रेलियामध्ये राहणे इतके सोपे नव्हते. तेथे त्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी अनेक छोटी मोठी कामे करावी लागत होती. वेटरपासून ते टॅक्सी ड्रायव्हर आणि कार वॉशपर्यंत त्याने कामे केली. दररोजचा खर्च तो यामधूनच काढत होता.

२००० मध्ये भारतात परत आला, मॉडेलिंग सुरु केली

रणदीप २००० मध्ये भारतामध्ये परत आला. त्याने एका एयरलाईन कंपनीच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करण्यास सुरु केले होते, त्याचबरोबर मॉडेलिंग आणि थियेटरमध्ये देखील त्याने काम शोधायला सुरु केली होती. इथेच एका प्लेच्या रिहर्सलदरम्यान मीरा नायरने त्याला पाहिले आणि आपल्या आगामी चित्रपटासाठी त्याला बोलावून घेतले. यादरम्यान राम गोपाल वर्माच्या डी चित्रपटामध्ये देखील रणदीपने काम केले होते पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सफल झाला नाही. वंस अपॉन ए टाइम इन मुंबई हा चित्रपट रणदीपच्या करियरसाठी टर्निंग पॉइंट ठरला.

लव्ह लाईफमुळे राहिला चर्चेमध्ये

चित्रपटांशिवाय रणदीप आपल्या पर्सनल लाईफमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिला. रणदीप हुड्डा आणि सुष्मिता सेन यांचे रिलेशन खूपच चर्चेमध्ये राहिले. पण दोघेही २००८ मध्ये वेगळे झाले, ३ वर्षानंतर हे नाते का संपुष्टात आले याबद्दल कोणालाही माहिती नाही.

सुष्मितासोबत अफेयर

रणदीप हु्ड्डा आणि सुष्मिता सेन यांनी एकमेकांना जवळ जवळ तीन वर्षे डेट केले होते. दोघांना एकमेकांसोबत खूपच कम्फर्टेबल पाहिले गेले होते. लोकांना रणदीप हुड्डा आणि सुष्मिता सेन यांची केमिस्ट्री खूपच पसंत येत होती. पण तीन वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. ब्रेकअपच्या काही दिवसांनंतरच दुबईच्या एका इवेंटमध्ये दोघांना पाहिले गेले होते, जिथे दोघेही एकमेकांना इग्नोर करताना दिसले होते. रणदीप हुड्डाने मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि सुष्मिता सेनची मुलगी रिनीला तो खूपच मानत होता. तर ब्रेकअपनंतर ते खूप खुश होते कारण ते स्वतः जास्त वेळ देऊ शकत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने