राजकुमार रावचे नाव आज बॉलीवूडच्या त्या अभिनेत्यांमध्ये सामील आहे जे आपल्या उत्कृष्ठ अभिनयासाठी ओळखले जातात. एकापेक्षा एक उत्कृष्ठ चित्रपट, छोट्या स्टाजरकास्टय पासून ते मोठ्या स्टायरकास्टे, अनेक प्रकारच्या भूमिका साकारलेल्या राजकुमारचा आज वाढदिवस आहे. बॉलीवूड पासून ते मित्र आणि चाहत्यांपर्यंत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकुमार इंडस्ट्रीच्या उत्कृष्ठ कलाकारांपैकी एक आहे, पण हा प्रवास त्याच्यासाठी खूपच कठीण होता. संघर्षाच्या दिवसांमध्ये राजकुमार राव खूपच साधा आणि सिंपल वागायचा.

दिल्लीमधून केले ग्रॅजुएशन


राजकुमार रावने दिल्ली विश्वविद्यालयच्या आत्माराम सनातन धर्म कॉलेज मधून ग्रॅजुएशन केले आहे, यानंतर भारतीय चित्रपट आणि टेलीव्हिजन संस्थेशी जोडला गेला आणि नंतर नशीब अजमावण्यासाठी मुंबईला पोहोचला. राजकुमारने बॉलीवूडमध्ये पहिला चित्रपट केला आहे तो आहे रण, नंतर लव सेक्स और धोखा आणि रागिनी एमएमएसमध्ये काम केले. पण त्याला खरी ओळख काई पो चे चित्रपटामधून मिळाली. राजकुमारला जेव्हा सुरुवातीला सफलता मिळाली नव्हती तेव्हा त्याने आपल्या आईच्या सांगण्यावरून आपल्या नावाची स्पेेलिंग देखील बदलली. खूपच कमी लोकांना माहिती आहे कि त्याचे खरे नाव राजकुमार यादव आहे.

कठीण काळ पाहिला आहे

राजकुमार रावसाठी चित्रपटांचा प्रवास सोपा नव्हता. एका मुलाखतीमध्ये राजकुमारने सांगितले होते कि तो एका दोस्तासोबत राहत होता. तो आपल्या हिस्स्याचे सात हजार रुपये देत होता. प्रत्येक महिन्यामध्ये १५-२० हजार रुपयांची गरज असायची. पण एक काळ असा आला कि माझ्या खात्यामध्ये फक्त १८ रुपये शिल्लक राहिले होते आणि माझ्या दोस्ताजवळ २३ रुपये. पैशांच्या तंगीमुळे त्याच्या टीचरने त्याला सपोर्ट केले. मुंबईमध्ये दोस्ताच्या बाईकवर ऑडिशन देण्यासाठी जात होता. सुंदर दिसण्यासाठी तो चेहऱ्यावर गुलाबजल लावत असायचा.

३ हजार रुपयांमध्ये केली होती एक भूमिका


राजकुमार, अमिताभ बच्चनच्या रण चित्रपटामध्ये न्यूज रीडरच्या भूमिकेमध्ये दिसला होता, हि खूपच छोटी भूमिका होती. यासाठी त्याला ३ हजार रुपये मिळाले होते. हा चित्रपट २००४ मध्ये रिलीज झाला होता. पण नशीब बदलण्यास उशीर लागला नाही, राजकुमारला काई पो चे नंतर वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट मिळू लागले. नुस्टन, अलीगढ़ शाहिद पासून बरेली की बर्फी, शादी में जरूर आना पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले.

गर्लफ्रेंड पत्रलेखा


राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखाचा नाते आता सार्वजनिक रूपाने सर्वांच्या समोर आले आहे. दोघांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शुटींग दरम्यान झाली होती. पहिल्याच भेटीमध्ये ते एकमेकांचा प्रेमात पडले. त्यांनी लग्नाचा देखील विचार केला आहे. २०१४ मध्ये दोघांनी सिटी लाइट चित्रपटामध्ये एकत्र काम केले, यानंतर दोघांचे नाते आणखीनच घट्ट झाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने